ओबीसीचे हक्कअबाधित राहण्यासाठी आरक्षण हाच पर्याय:- एड .बाळासाहेब आंबेडकर

HomeNewsनागपुर डिवीजन

ओबीसीचे हक्कअबाधित राहण्यासाठी आरक्षण हाच पर्याय:- एड .बाळासाहेब आंबेडकर

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – ओबीसी यांचे हक्क अबाधित राहण्यासाठी आरक्षण हाच पर्याय आहे.आरक्षण वाचलं पाहिजे . त्यांनी आपले भाषणात धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, असे ठणकावून सांगितले.जातींचे उपवर्गीकरण करणे ही जाती-जातीत भांडण लावण्याचा  हा एक भाग आहे. क्रिमिलियर लावणे म्हणजेच आरक्षण संपविणे होय.*ज्या कुटुंबातील एक व्यक्ती नोकरीवर लागला असेल त्या कुटुंबातील दुसरा व्यक्ती नोकरीवर लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणे  सुरू आहे.जर तुम्हाला  हे नको वाटत असेल आरक्षण वाचलं पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर हे मुस्लिम लायब्ररीमध्ये असलेल्या भंडारा येथील सभेत आपले मत व्यक्त केले
समोर त्यांनी सांगितले की
  म्हणून वंचित बहुजन आघाडीचे डॉअविनाश नान्हे यांना उमेदवारी दिली आहे   विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून गेले पाहिजे. तेथे ठराव होईल . व आमचे आमदार तेथे आपली बाजू मांडेल आणि आपण आरक्षणाची लढाई जिंकू. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात 50 टक्के कशी मते मिळतील? याचा विचार करावा . अशा कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

  सत्ता संपादन मेळावा व प्रचार सभेला पंधरा हजार लोक उपस्थित होते. विचार मंचावर तुमसर, चिमूर, अर्जुनी चे अधिकृत उमेदवार उपस्थित होते. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसेच विचार मंचावर धनपाल गडपायले, डी .जी, रंगारी, अजय रामटेके, युवराज सुखदेवे, प्रभाकर मेश्राम , मोदकराज रामटेके, महादेव सुखदेवे, सुरेश खंगार ,डॉ.अविनाश नान्हे, जनार्दन खेडकर, अनिल दिघोरे, टेंभुर्णे मॅडम, दीपक जनबंधू,  जगदीश रंगारी, डॉ. प्रेमलाल मेश्राम, शीतल नागदेवे, मनिषा खोब्रागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णु चाचेरे व  आभार प्रदर्शन अनिल दिघोरे  यांनी केले.

COMMENTS