समाजाचे संघटन मजबूत होणे काळाची गरज – मा. श्री मधुकरराव वाटेकर सेवा नि. मुख्याध्यापक
गौतम नगरी चौफेर (राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी भद्रावती) -: दोन दिवसीय श्री संतनगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव श्री संत नगाजी महाराज देवस्थान येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार, रांगोळी स्पर्धा, आनंद मेळावा, भजन, शोभायात्रा, महिला व मुलींकरीता विविध स्पर्धा, प्रबोधन किर्तने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री मधुकरराव वाटेकर सेवा.नि मुख्याध्यापक भद्रावती, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरज शहा, वीज अभियंता जयप्रकाश लोनगाडगे, माजी अध्यक्ष शेखरजी घूमे, अतेशाह अली नगराध्यक्ष वरोरा, सुमित हस्तक, नगाजी निंबाळकर, माजी अध्यक्ष बंडूभाऊ व्ही लांडगे, बंडूभाऊ डाखरे ओ बि सी कार्यकर्ते वरोरा ,महिला माजी अध्यक्षा मायाताई चिंचोलकर, महिला अध्यक्षा रेखाताई अतकरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी मा. मधुकरराव वाटेकर सेवा नि. मुख्याध्यापक यांनी आपल्या अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना समाज संघटन मजबुत होणे अत्यंत काळाची गरज आहे. केवळ पदासाठी भांडण- वाद केल्यास आपले संघटन कमजोर होऊन इतर लोक आपल्या समाजाचा गैरफायदा घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे आपली पुढे येणारी पिढी गारद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समाजातील धुरंधर व अनुभवी लोकांनी पदाचा लोभ न करता समाजाच्या विकासासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. आणि नवीन युवकांना संधी घ्यावी यांना मार्गदर्शन करावे. एखाद्याच्या कामात खोट व चालढकपणा आढळून आल्यास त्यांचा सामूहिक रित्या त्याग, विरोध करावा जेनेकरुन समाजास योग्य मार्ग मिळेल असे प्रत्येक समाजातील जाणत्या व्यक्तीने वागले तर समाजाची उन्नती व प्रगती नक्कीच होईल असे प्रतिपादन केले. पुण्यतिथी महोत्सवा निमित्त उपस्थित समाजांना संबोधित करताना समाज सार्वजनिक कार्यक्रमात ज्या प्रकारे सहभागी होत असतो त्याचप्रमाणे आपल्या समाजात जन्म घेणाऱ्या संताच्या पुण्यतिथी महोत्सवात एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते सुरज शहा यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलेही मनोगत व्यक्त केले. किर्तनकार ह. भ. प. पुंडलिक गाडगे महाराज हिवरा (मजरा) यांनी आपल्या शैलीत श्रोत्यांच्ये हसवुन मनोरंजन केले. नवीन पिढीला समाज प्रबोधन केले.
यावेळी रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक रितीका चिंचोलकर दुसरा क्रमांक माधुरी देवईकर, तिसरा क्रमांक शुभांगी दैवलकर, चौथा क्रमांक दिमीनी लांडगे, पाककला या स्पर्धेत प्रथम रोशनी शेंडे, दुसरा करुणा नक्षिणे, प्रोहत्सानपर बक्षीस छायाताई वाटेकर, सुप्रिया निंबाळकर यांनी तर गुणवंत विध्यार्थ्यांमध्ये इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक दर्शन अंकुश दर्वे यांना ९१.८० टक्के,दुसरा ईर्षा नंदकिशोर नक्षिणे यांना ८१.८० टक्के, तिसरा प्रसाद मधुकरराव वाटेकर ७८.०० टक्के, रितेश गंधबुडे यांना ६६.०० टक्के पदवीधर, व साक्षी संजय अतकरे समाजकार्य या शिक्षण पदवी गोंडवाना विद्यापीठ मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला येणाऱ्या महिलांचा तसेच १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शहरातून संतनगाजी महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी नगाजी महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र हणुमंते,कार्याध्यक्ष हरीश घुमे,सचीव सचिन नक्षिणे ,उपाध्यक्ष सुरेशराव जमदाडे,कोषध्यक्ष पांडुरंग हणुमंते,सहसचीव हणुमान नक्षिणे, सतीश मांडवकर,राजेश येसेकर,सुधिर लांडगे,पियुष घुमे,महिलाध्यक्षा सौ.सुरेखाताई अतकरे, उपाध्यक्षा सौ.प्रतिभा नक्षीने,कार्याध्यक्षा सौ. रागिणी सुत्रपवार,कोषध्यक्षा सौ. भुवनेश्वरी निंबाळकर,ससचिव सौ. मोणाली जांभुळकर,सहसचिव सौ. सविता लांडगे,वर्षाताई वाटेकर, लीलाबाई नक्षिणे,नंदनी लांडगे,शोभा लांडगे, गौरी नक्षिणे,छायाताई जमदाडे,सविता लांडगे,रंजना लांडगे, नंदकिशोर नक्षिणे,सागर घुमे, प्रकाश दैवलकर, गणेश दैवलकर,प्रशांत नक्षिणे,मंगेश वाटेकर,श्रिकांत घुमे, सुभाष मांडवकर,सतिश जांभुळकर,विजय मेश्राम,शंकर हणुमंते, अंकुश दर्वे तसेच सलून दुकानदार संघटना व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत जमदाडे,प्रास्ताविक हरीश घुमे, आभार प्रदर्शन रवींद्र हणुमंते यांनी केले.
COMMENTS