पोलीस प्रशासनाच्या मदतीने मंदिरात अडकलेल्या नागरिकांची सुटका

HomeNewsचंद्रपूर

पोलीस प्रशासनाच्या मदतीने मंदिरात अडकलेल्या नागरिकांची सुटका

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : (दि. २३) रोज बुधवारला तालुक्यात मोठ्याप्रमाणात पाऊस पडला यामुळे उंच टेकडी भागवरून वाहत येणाऱ्या राजुरा शहरलगत वाहणाऱ्या भवानी नाल्याला रात्रो दहा वाजता अचानक आलेल्या पाण्यामुळे तीन तास राजुरा गडचांदूर मार्ग बंद झाला होता. यामुळे नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

याचवेळी भवानी मंदिर येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलेल्या दहा ते बारा नागरिकांना नाल्याला आलेल्या पाण्यामुळे अडकून रहावे लागले. घटनेची माहिती राजुरा तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला मिळताच तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग हाके व पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार यांनी मंदिरात अडकलेल्या काही पत्रकार आणि नागरिकांना जेसीबीच्या सहाय्याने रेस्क्यू करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे जेसीबी पाण्यात चालविणे शक्य नसल्याने पोलिसांनी मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीवर चडून प्रत्येकाना रेस्क्यू करीत रात्रो अकरा वाजता बाहेर काढले. आमदार देवराव भोंगळे यावेळी प्रत्यक्ष नागरिकांच्या संपर्कात राहून प्रशासनाकडून मदत बचत कार्याची माहिती घेत होते. मंदिर परिसरातून पाण्याचा प्रवाह खुप वेगाने होता व मंदिर परिसरात चार ते पाच फूट पाणी असल्याने त्याठिकाणी कोणालाही जाता येत नव्हते. नाल्याचे पाणी राजुरा शहराची आराध्य दैवत असलेल्या भवानी मंदिराच्या पोर्च मध्ये शिरले होते. याच मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात एक प्रमोद गटलेवार मतिमंद युवक अडकून असल्याचे दिसताच प्रसंगवधान साधून पत्रकार सागर भटपल्लीवार यांनी त्यांना सुखरूप भवानी मंदिरात आणले.

पाण्यात अडकलेल्यांमध्ये रामपूर राजुरा येथिल नामदेव गौरकार, प्रा. सुयोग साळवे, बंटी गौरकार, संदिप हिंगाने, रमेश भोयर, रमेश जिवतोडे, पत्रकार सागर भटपल्लीवार, सुरेश साळवे, गणेश बेले, श्रीकृष्ण गोरे आणि इतर चार नागरिक यांना पोलीस प्रशासनाने रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढले.

फोटो : 1) याच भवानी मंदिराच्या आतील परिसरात नागरिक अडकले होते

फोटो : 2) हनुमान मंदिरात अडकलेल्या मतिमंद प्रमोद गटलेवार या युवकाला पाण्यातून बाहेर काढताना पत्रकार सागर भटपल्लीवार

COMMENTS

You cannot copy content of this page