गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण. जिवती) – चंद्रपूर जिल्ह्यातील येत असलेल्या जिवती येथील देशाचा मान आणि संविधानाचा सन्मान या संकल्पेतून संस्थेत प्राचार्य श्री गुणानंद एम वासनिक यांच्या मार्गदर्शनात आज संविधान दिन व तसेच विदर्भाचे रॉबिन्हूड समजले जाणारे शामा दादा कोलाम यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे गटनिदेशक श्री जितेंद्र घ्यार, शिल्पनिदेशक श्री विनय खांडेकर, श्री विवेक शेंडे, श्री रवि जेवाले, श्री आकाश देवरवाड, श्री राम चव्हाण, श्री योगेश पट्टेवाले आणि शिल्पनिदेशिका कु. दीपा मेश्राम, कु. सारिका वासेकर, मुख्य लिपिक श्री गोतमारे सर, कनिष्ठ लिपीक मलिक सर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS