रासेयो श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाभिमुख व नेतृत्वगुणांचा विकास – सुभाष धोटे

HomeNewsनागपुर डिवीजन

रासेयो श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाभिमुख व नेतृत्वगुणांचा विकास – सुभाष धोटे

गौतम नगरी चौफेर कोरपना: गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कला महाविद्यालय, गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) युवा नेतृत्व व श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा आसन बू., गट ग्रामपंचायत बिबी येथे उत्साहात पार पडला.

          उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे होते. उद्घाटक म्हणून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे संचालक डॉ. अनिल चिताडे उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सुभाष धोटे यांनी रासेयो शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाभिमुखता, शिस्त, कर्तव्यभावना व नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष विकास भोजेकर, गटग्रामपंचायत बिबीच्या सरपंच माधुरी टेकाम, प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, उपमुख्याध्यापक विजय डाहुले, उपसरपंच आशिष देरकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रदीप परसुटकर, माजी सरपंच मंगलदास गेडाम, ग्रामपंचायत सदस्य बंडू नैताम, पोलीस पाटील प्रवीण आडे (आसन बु.), व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश मंगाम, माजी सैनिक सोमेश्वर आडे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा येसेकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी केले. संचालन सुधीर थिपे यांनी केले तर आभार चेतना कामडी यांनी मानले.

COMMENTS

You cannot copy content of this page