गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड आपल्या शेजारच्या गावांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्य व रस्ता सुरक्षा लक्षात घेऊन 16 ऑगस्टच्या मध्यरात्री माणिकगड कंपनी गेट क्रमांक 1 ते रामकृष्ण हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंची माणिकगढ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. सर्व नागरिकांना स्वच्छ वातावरणाचा अनुभव घेता यावा यासाठी रस्ते साफ करण्याबरोबरच स्वच्छता मशिन फिरवण्यात आल्या व पाण्याचा शिडकावाही करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमुळे गडचांदूरवासीयांची पर्यावरणीय स्वच्छता व रस्ता सुरक्षा सुधारेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास माणिकगडचे प्रशासन व सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्वत: उपस्थित राहून लक्ष घालत होते. माणिकगड आपल्या कार्यातून शेजारील गावातील नागरिकांच्या हिताचा सतत विचार करत असल्याचे आपल्याला दिसून येते.
COMMENTS