गौतम नगरी चौफेर (विनोद खंडाळे) – नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गडचांदूर येथील अनेक घरांमधील बोरिंगमधून सध्या दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पाण्याचा रंग बदललेला असून, त्यातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. परिणामी, अनेक ठिकाणी पाण्यामुळे नागरिकांना पोटदुखी, उलट्या, त्वचाविकार अशा आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या समस्येबाबत नगरपरिषद आरोग्य विभाग आणि प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
“नियोजनबद्ध उपाययोजना न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहेत.”
COMMENTS