वृद्ध कलावंतांचे मानधन प्रकरणे तपासून निवड करा अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन

HomeNewsचंद्रपूर

वृद्ध कलावंतांचे मानधन प्रकरणे तपासून निवड करा अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने सलग 3 वर्षापासून वृद्ध कलावंतांची निवड प्रकिया थांबलेली होती त्या 29 जुलै 2024 ला वृद्ध कलावंत मानधन समिती तयार करा याविषयी जिल्हाधिकारी कार्यायल भंडारा येथे संगीतमय आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाची दखल घेत शासनाने 26 आगस्ट 2024 ला वृद्ध कलावन्त मानधन समिती तयार केली. परंतु अजून पर्यत कुठल्याही कलावंतांची फाईल तपासणी करून निवड झालेली नाही 8 ते 10 दिवसात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता मग पुन्हा तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली फाईल तपासणी होणार नाही व शेकडो कलावन्त या निवड प्रक्रिये पासून वंचित राहतील त्यासाठी प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा च्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व लवकरच निवड कलावन्त निवड प्रक्रिया करावी या साठी निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम, प्रबोधनकार मनोज कोटांगले व प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी दिले.

COMMENTS