विजय नंदागवळी हे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

HomeNewsनागपुर डिवीजन

विजय नंदागवळी हे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा विभागाच्या वतीने गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा दिनांक 24/7/2025 ला विभागीय कार्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्या ठिकाणी  मा .श्रीकांत गभणे प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर प्रदेश यांच्या हस्ते विजय नंदागवळी माजी साहाय्यक वाहतूक अधीक्षक यांना  शाल, स्मृती चिन्ह, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

त्या प्रसंगी आदमने साहेब सांख्येकी  अधिकारी नागपूर, अशोक वाडीभस्मे विभाग नियंत्रक गडचिरोली, श्रीमती सूतोने मॅडम विभाग नियंत्रक चंद्रपूर, विभागीय कार्यशाळेचे पंकज वानखेडे तसेच कॉस्ट्राईब रा. प.संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोळके, सचिव प्रशांत भोयर, साकोली आगार सचिव राहुल ईलमकर, गोंदिया आगार सचिव सचिन गजभिये, पवनी येथील निलेश रामटेके तसेच विभागीय सर्व आगार व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page