वैनगंगा नदीवरील गॅलरी ऑफ वॉटर व्हयू चा मनसोक्त आस्वाद घ्यावा -राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे

HomeNewsनागपुर डिवीजन

वैनगंगा नदीवरील गॅलरी ऑफ वॉटर व्हयू चा मनसोक्त आस्वाद घ्यावा -राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे

गौतम नगरी  चौफेर (विशेष प्रतिनिधी भंडारा) – आज दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ला दुपारी एक वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या गॅलरी ऑफ वॉटर व्हयू ला भेट देऊन मनसोक्त आनंद घेतला .भंडारा ते नागपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या अंभोरा वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलीयाच्या मध्यभागी गॅलरी ऑफ वॉटर व्हयु ची उभारणी करण्यात आलेली असून याचा आनंद घेण्याकरिता पर्यटक संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी ये जा करीत असतात. पर्यटकांनी वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गॅलरी ऑफ वॉटर व्हीयू चा आनंद घेतल्यास चारही बाजूला आपण निसर्गाच्या कुशीत दडलेलं आहोत असं आपणास भास होते. त्यामुळे आपण आवर्जून या ठिकाणी भेट द्यावी.

COMMENTS