नारायणगुडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

HomeNewsनागपुर डिवीजन

नारायणगुडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

गौतम नगरी चौफेर कृष्णा चव्हाण. जिवती – तालुक्यातील आंध्र महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या नारायणगुडा येथे काल दिनांक 18 8 2025 रोजी दुपारी दोन वाजता लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती भर पावसातही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. अंकुश गोतावळे माजी उपाध्यक्ष नगरपंचायत जिवती उद्घाटक श्री प्रेम राठोड तंटामुक्त अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे श्री कलाम साहेब झेडपीटीसी  केरामेरी, प्रा. सुग्रीव गोतावळे माजी सभापती श्री भानुदास जाधव सामाजिक कार्यकर्ता श्री दत्ता तोगरे श्री विजय गोतावळे श्री उत्तम कराळे सर श्री संतोष गोतावळे श्री लहुजी गोतावळे श्री विष्णू आमपल्ले इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या यावेळी अनेक मान्यवराने अण्णाभाऊंच्या विचारावर प्रकाश टाकला. मातंग समाज व्यसनाधीनता व आजच्या पिढीतील शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन यावर सुद्धा विचार मांडले अध्यक्ष भाषणातून डॉ. गोतावळे यांनी मातंग समाजाने महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठीच अण्णाभाऊंची जयंती साजरी करणे गरजेचे आहे. असे सांगितले व येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व नोकरीला लागावे तरच समाजाची प्रगती होऊ शकते. अन्यथा प्रत्येक पक्ष समाजातील युवकांना शाखाप्रमुख करून समाजाचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही असेही खंत व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रमेश तोगरे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन श्री उमेश पट्टेवाले यांनी केले या कार्यक्रमाला पळसगुडा, कुंबेजरी, पाटागुडा, भोलापठार येथील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील सर्व महिला भगिनी, युवक, युवती व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्री सुरज गायकवाड, बालाजी तोगरे, बबन पट्टेवाले, राहुल वाघमारे, दर्शन वाघमारे, गोपाळ पतेवाले, बंडू वाघमारे, नागनाथ वाघमारे, गणेश तोगरे, करण घोसे, उमेश जाधव, प्रेम जाधव, तिरुपती तोगरे, चंद्रकांत पट्टेवाले, शिशुपाल गायकवाड, व्यंकटी पट्टेवाले, हनुमंत तोगरे, वसंत पटेवाले, श्री घोडके इत्यादींनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केले.

COMMENTS

You cannot copy content of this page