विसापूर मध्ये संताजी जगनाडे महाराज 400 वी जयंती महोत्सव उत्साहात

HomeNewsनागपुर डिवीजन

विसापूर मध्ये संताजी जगनाडे महाराज 400 वी जयंती महोत्सव उत्साहात

गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण) –
महाराष्ट्राचे थोर संत, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा 400 वी जयंतीचा महोत्सव 8 डिसेंबरला विसापूरमध्ये तेली समाज बांधवांच्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात आला.

माजी सरपंच बंडू गिरडकर व माजी सैनिक रामदास हरणे यांच्या हस्ते घटस्थापना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे उदघाटन कविता गिरडकर, प्रमुख पाहुणे मोहिनी वरघणे मॅडम व रविना ठाकरे, मोनिका शेंडे, अनिता कुईटे, मनीषा ढेंगरे, सुरेखा इटनकर, सविता इटनकर याच्या शुभहस्ते करून जगनाडे महाराज यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात संतांचे योगदान विषयावर भाषण स्पर्धा, शिक्षणाचे महत्व विषयावर निबंध व 5 ते 13 वर्ष वयोगटात नृत्य स्पर्धा घेण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात पर्यवेक्षिका म्हणून मोहिनी वरघणे मॅडम शिक्षिका जि.प.उच्च प्राथमिक शाळा, पंचाळा उपस्थित होते.

सायंकाळी 4 वाजता समाजबांधवांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढून गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 400 वी जयंती महोत्सवात अध्यक्षस्थानी नरेंद्र इटनकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर, दिनेश वरघणे सर मुख्याध्यापक जि.प.हायस्कूल विसापूर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी समाजबांधवांना जगनाडे महाराज यांच्या जीवनावर भर देऊन समाजाला नवी ऊर्जा देण्याच्या दृष्टीने प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. समाजातील तरुणांनी संताजी जगनाडे महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करावी असा संदेश अंगीकृत करण्याच्या संकल्प या जयंतीच्या महोत्सव प्रसंगी घेण्यात आला व समाजाला संघटित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन समाजाला सर्वांगीण विकासामद्धे पुढे नेण्याचे प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षिस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य गजानन पाटणकर, तेली समाज उपाध्यक्ष दिनकर गिरडकर, सचिव अक्षय देशमुख, कोषाध्यक्ष नंदकिशोर गिरडकर, सहसचिव संतोष वैरागडे, संचालक रामदास हरणे, विजय गिरडकर, शंकर गिरडकर, अरुण बावणे, अशोक गिरडकर, विलास गिरडकर, विनोद गिरडकर, प्रफुल पोहाणे, प्रितम पाटणकर, कार्यक्रम नियोजन समिती अध्यक्ष अमोल खनके, उपाध्यक्ष राहुल बुटले, सचिव राहुल गिरडकर, सहसचिव कुणाल लोखंडे, कोषाध्यक्ष विठ्ठल साखरकर व तेली समाज युवा सदस्य, तेली समाज युवती मंच व सर्व तेली समाजबांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय देशमुख, संचालन सुरेश इटनकर व आभार विठ्ठल साखरकर यांनी मानले.

COMMENTS