महिलांची गावागावात एकच चर्चा !भाऊ पैसे खात्यात केव्हा जमा करणार ?
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस व अजितदादा पवार यांच्या सरकारने आमची सरकार पुन्हा 2024 मध्ये सत्तेत आल्यास हा तुमच्या लाडका भाऊ तुम्हाला पंधराशे रुपये नाही तर 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करणार !हा वचननामा सरकारने दिला होता. 20 नोव्हेंबरला मतदान झाले आणि 23 तारखेला मतमोजणी झाली या मतमोजणी मध्ये सरकारला स्पष्ट बहुमत दिले. सरकारला बहुमत दिले असले तरी महायुतीमध्ये सामंजस्य बरोबर नसल्याने सत्ता स्थापनेसाठी पंधरा दिवस लागले फक्त पक्षनेतेपदी निवड झालेल्या प्रमुखांची त्यात देवेंद्र फडवणीस यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी म्हणून निवड झाली .तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे ,अजितदादा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली व त्यांना राज्यपालांच्या उपस्थितीत गोपनीयतेची शपथ देण्यात आली.परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास अजून विलंब लागत आहे. परंतु आमच्या महिला भगिनी यांनी ज्या विश्वासाने महायुती सरकारला मतदान केले त्या महिला आमच्या खात्यात 2100 रुपये केव्हा जमा होणार अशी आतुरतेने वाट बघत आहेत व महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एकच चर्चा रंगत आहे की, महायुती सरकार आमच्या खात्यात 2100 रुपये केव्हा टाकणार याकडे आतुरतेने वाट बघत आहेत.
COMMENTS