भारत मुक्ती मोर्चा च्या 1 जुलै भारत बंद जनआंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद

HomeNewsनागपुर डिवीजन

भारत मुक्ती मोर्चा च्या 1 जुलै भारत बंद जनआंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद

शास्त्री चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे करण्यात आले होते आयोजन

गौतम नगरी चौफेर  संजीव भांबोरे भंडारा – दिनांक 1 जुलै 2025 ला दुपारी एक वाजता शास्त्री चौक ते भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय त्रिमूर्ती चौक येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात भारत मुक्ती मोर्चा भंडारा जिल्ह्यातील सर्व  तालुक्यातील लोकांनी एकत्र येऊन भारत बंद सफल केले, यात प्रामुख्याने राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा ,राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय किसान मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारतीय विद्यार्थी ,युवा ,बेरोजगार मोर्चा, स्टॅम्प पेपर वर चुनावी जाहीरनामा घोषित करणारी जगातील एकमेव पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, अशा शेकडो राष्ट्रीय संघटनेचे लोक सहभागी होते , या मोर्चातील प्रमुख मागण्या प्रामुख्याने
ईव्हीएम मशीन बंद करून बैलट पेपर वर चुनाव केले जावे, संसदीय लोकशाही प्रणाली लागु करावी, अमित शहा ने देशाची जाहीर माफी मागावी ,बौद्धगया विदेशी ब्राम्हणापासून मुक्त करून मूलनिवासी बौद्ध धर्माच्या ताब्यात देण्यात यावी, वक्फ बोर्ड संशोधन विधेयक 2025 रद्द करण्यात यावे, स्मार्ट (रिचार्ज वाला मीटर) विरोध  अपार आय डी विरोध , बोगस बी बियाणे, खतांच्या वाढीव किमती, शिक्षण बाजारीकरण , सोलार शक्ती, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढीव किमती, शेतकरी कर्ज मुक्ती , निराधार लोकांचे थकीत पैसे , वाढती बेकायदेशीर बेरोजगारी, अशा अनेक प्रकारच्या समस्या विरोधात भारत बंद चे आयोजन केले होते ,
भंडारा शहरातील शास्त्री चौकातून रॅली ला सुरुवात होऊन सरकार विरोधात नारेबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रॅली चे समारोप झाले ,  आमच्या मागण्या वेळीच पूर्ण झाल्या नाही तर आणखी प्रत्येक महिन्याला भारत बंद चे आयोजन केले जाईल , याची शासन प्रशासन ,लोकप्रतिनिधी  व संबंधित विभागाने नोंद घ्यावी . आंदोलन यशस्वी करण्याकरता रविदास लोखंडे ,अभय रंगारी, विजयकांत बडगे, अभिनव तिडके, परवेज शेख ,भारत बनसोड, धर्मेंद्र मेश्राम, कपिल रंगारी, निखिल राऊत, भोजराज गभने सहकार्य केले.

COMMENTS

You cannot copy content of this page