गौतम नगरी चौफेर राहुल हंडोरे मुरबाड दि. 30 जून 25
मुलगा शिकला तर तो स्वतः सुधारतो, पैसे कमावतो परंतु मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब सुधारते असे उदगार मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद येथील प्राचार्य प्रा. डॉ. वैशाली प्रधान यांनी माता भीमाई रामजी आंबेडकर संस्था मुरबाड यांचे विद्यमाने आयोजित कार्यक्रमात काढले. अध्यक्षस्थानी पद्माकर गायकवाड होते.

माता भीमाई रामजी आंबेडकर संस्था मुरबाड यांचे विद्यमाने मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आदिवासी गरजू विधार्थी/लाभार्थी शालेय उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम मुरबाड येथे आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी प्रा. डॉ. वैशाली प्रधान प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, एक क्षेत्र निवडा त्या साठी काम करा. नामांतर चळवळी नंतर चळवळी झाल्या नाहीत. शिक्षण क्षेत्र खूप अवघड झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद होत आहेत. आपली मुले शिकत नाहीत, आपला ग्राफ खाली येत आहे अशी खंत प्रा. डॉ. वैशाली प्रधान यांनी या प्रसंगी व्यक्त केली. या प्रसंगी जियाजी वाघमारे, डॉ गौतम गोसावी, डॉ पद्माकर तायडे, ऍड. विशाल जाधव, विनायक कांबळे, पूजा हातांगडे, उषा चासकर आदि समाजसेविकांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी प्रबोधनत्मक गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला मंत्रालयातील मा. उप सचिव कैलास भंडालकर, आर पी आय महाराष्ट्र राज्य सह सचिव राहुल हंडोरे, डॉ आंबेडकर फोर्स अध्यक्ष संदेश सकपाळ, आदि. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आबासाहेब चासकर यांनी केले



COMMENTS