होलसेल दरात देशी दारू विक्री करणा- या परवाना धारकावर कायदेशीर कारवाई करावी

HomeNewsनागपुर डिवीजन

होलसेल दरात देशी दारू विक्री करणा- या परवाना धारकावर कायदेशीर कारवाई करावी

पटकोटवार यानी केली संबंधित विभागाकडे कारवाईची मागणी

गौतम नगरी चौफेर // संतोष पटकोटवार – कोरपना तालूक्यातील गडचांदुरातील होलसेल दरात देशी दारू विक्री करणा–या देशी दूकानदारावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार यानी संबंधित विभागाकडे कारवाईची मागणी केली, गडचांदुर येथे अंदाजे पाच–ते सहा देशी दारूचे दुकानें आहेत, त्यांचेकडे फक्त चिल्लर विक्री करण्याचा परवाना आहे, परंतू काही देशी दूकानदार काही लोकांना नियम बाह्य रीतीने होलसेल दरात दारू विक्री करीत आहे, सकाळी आठ ते रात्री दहा वाज़ेपर्यंत दारू विक्री करण्या साठी शासनाने वेळ ठरवून दिली आहे, संपूर्ण चौदा तास दारू विक्री करून सूधा या देशी दूकानदाराचे समाधान होत नसल्याचे पहायला मिळत आहे, काही लोकांना हाताशी धरून त्यांना होलसेल दरात दारू विक्री करून रात्रिच्या वेळेमध्ये व पहाटे नियम बाह्य रीतीने दारू विकायला लावत असुन अवैध रीतीने माया गोळा कारण्याचा प्रयत्न करीत आहे, यामुळे तरून यूवापिढी नशेच्या आहारी जात असुन काही लोकांचे संसार ऊधदवसत होत आहे, घरचा कर्ता पूरूष संपूर्ण केलेली कमाई दारूच्या पान्यात घालत असल्याने अख्खा कुटुम्ब रस्त्यांवर येन्याची वेळ काही लोकांवर आली आहे, रात्री पाळी मध्ये दारू पिऊन लीवर, कीडनी डॅमेज होऊन काही नागरीकांचा नाहक बळी जात आहे, या नियमबाह्य होलसेल देशीदारू विक्री मुळे गडचांदूरात ठीकठीकाणी  अवैध रीतीने दारु विक्री सूरू असून याची सखोल चौकशी करण्यात येऊन होलसेल दरात देशी दारू विक्री करणा–या दारू दुकानदारावर संबंधीत विभागाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार, माजी सरपंच चरणदास मेश्राम, बापुराव कलेगुरवार,पांडुरंग ईदे,विलास बाचले, गोपाल चांदेकर, सिकंदर बनसोड, निखिल कागणे, इत्यादि लोकांनी पोलीस स्टेशन गडचांदूरचे थानेदार शिवाजी कदम तसेच अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपुर यांच्या कडे  लेखी निवेदना द्वारे केली, संबंधीत विभाग काय ॽॽ कारवाई करते या कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS