HomeNewsनागपुर डिवीजन

शेतकऱ्यांनी खत बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी शासन मान्यता कृषी निविष्ठांचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे

गौतम नगरी चौफेर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी – कृष्णा चव्हाण
बोगस व बेकायदेशीर बियाणे म्हणजेच ज्या बियाण्याच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची परवानगी नसते, बियाण्याच्या उत्पन्नासंबंधी मनघडन व खोठे दावे करून आमीश दाखवण्यात येते , बियाण्याच्या व्यवहारांमध्ये शासन मान्य दराचे अधिकृत बिल शेतकऱ्यांना दिले जात नाही, बियाण्याच्या पाकिटावर बियाण्याच्या गुणवत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो अनाधिकृत बियाणे वापरामुळे जर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाईची हमीशासन व ग्राहक मंच सुद्धा देऊ शकत नाही असे बियाणे बोगस व बेकायदेशीर असते शेतकऱ्यांनी रासायनिक खते बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी यासाठी पक्क्या बिलाचा आग्रह धरावा विक्रेता पक्के बिल  देत नसल्यास किंवा इतर कुठली शंका तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून तक्रार नोंदवावी बिलावर खरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवत्तेचा संपूर्ण तपशील नोंदवलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी खरेदी केलेल्या बियाण्याचे पाकीट सीलबंद मोरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी बियाण्यांच्या उगवण क्षमतेचा अंतिम मुदतीचा दिनांक पाहूनच पॉकेट किंवा बग खरेदी करावी एमआरपी पेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास त्वरित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी रासायनिक खत खरेदी करताना बॅग वरील एमआरपी किंमत बघूनच खरेदी करावी जर कोणताही व्यक्ती अथवा संस्था बेकायदेशीर पद्धतीने बोगस बियाण्याची खताची विक्री करतांना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध बियाणे नियंत्रण आदेश १९८३ वर रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल अशी बोगस बियाणे व खाते विक्रीची बाब निदर्शनास आल्यास तत्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS