वर्ष 2022 ते 24 आर्थिक वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप
गौतम नगरी चौफेर (नांदेड-संजीव भांबोरे) – जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागातील नांदेड तालुक्यासह बारा वनपरिक्षेत्रामध्ये वर्ष 2022 ते 2024 दरम्यान जिल्हा वार्षिक योजना व भरगच्च वनीकरण योजनेअंतर्गत केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित झाल्याचा आरोप करीत पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर व जिल्हाध्यक्ष मारुती शिकारे यांनी दिनांक 09 डिसेंबर 2024 पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत नांदेड येथे नांदेड तालुक्यासह नायगाव, हदगाव, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, मुदखेड, मुखेड, बिलोली, लोहा, कंधार व देगलूर येथे वनपरिक्षेत्र कार्यालय कार्यरत आहेत. या कार्यालया अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपवाटिका निर्मिती, घनवन वृक्ष लागवड, रस्ता दुर्फा वृक्ष लागवड यासह जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली आहेत. परंतु ही कामे शासनाच्या अंदाजपत्रकानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे करण्यात आली नाहीत तसेच यामध्ये मोजमाप पुस्तके प्रमाणे कामे न करता मोठा आर्थिक गैरवर केल्याचा आरोप पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने केला असून याबाबत उच्चस्तरीय समिती गठित करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत पत्रकार संघाच्या वतीने यापूर्वी आमरण उपोषणाचा इशारा दिला असता, संबंधित विभागाने उपोषण स्थगित करून चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विभागाने कोणत्याही प्रकारची हालचाल न केल्याने सोमवार दिनांक 09 डिसेंबर 2024 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर मराठवाडा विभाग समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष शंकर सिंग ठाकूर व जिल्हाध्यक्ष मारुती शिकारे यांनी दिला आहे.
COMMENTS