आदर्श शाळेत मतदान जनजागृती अंतर्गत विध्यार्थी साखळी.

HomeNewsनागपुर डिवीजन

आदर्श शाळेत मतदान जनजागृती अंतर्गत विध्यार्थी साखळी.

– ” मतदान करा 70- राजुरा “
राष्ट्रिय हरीत सेना, स्काउट्स – गाईड्स  चा उपक्रम.

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी बादल बेले राजुरा) – 26 ऑक्टोबर
   बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल येथे मतदान जनजागृती अंतर्गत ” मतदान करा 70 राजुरा ” असे विद्यार्थी साखळीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. यावेळी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे, साचिव भास्करराव येसेकर, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर , राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमूख, स्काऊट मास्तर बादल बेले, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लुरवार आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्ार्थ्यांनी मातीचे दिवे तयार करुन आणले व पर्यावरणपूरक दिपोत्सव साजरा करण्याची प्रतिज्ञा घेतली. राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट्स -गाईड्स युनिट व इतरही विध्यार्थीनी या साखळीत सहभाग घेतला व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेतली. यावेळी आदर्श प्राथमिक चे शिक्षक रुपेश चिडे, रोशनी कांबळे, सुनीता कोरडे, वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, रजनी पिदुरकर, प्राजक्ता साळवे, माधुरी रणदिवे, वैशाली चीमुरकर , मनीषा लोढे , पूजा इटनकर, आदर्श हायस्कूल चे शिक्षक नवनाथ बुटले, प्रशांत रागीट, विकास बावणे, मेघा वाढई, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे आदींची उपस्थिती होती.

यापूर्वी सुद्धा आदर्श शाळेने अनेक सामाजिक, पर्यावरणीय संदेश विद्यार्थी साखळी च्या माध्यमातून दिले आहे. नुकतीच महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामूळे जास्तीत जास्त प्रौढ मतदारांनी, युवक – युवती, जेष्ठ नागरिक, सर्वच मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करुन आपला हक्क अधिकार बजावावा या करीता जनजागृती करण्यात आली. तसेच स्काउट्स – गाईड च्या माध्यमातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री धोटे यांनी केले. तर प्रास्ताविक बादल बेले यांनी व आभार रूपेश चिडे यांनी मानले.

COMMENTS