HomeNewsनागपुर डिवीजन

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला संगणकीय चुकीने मिळालेल्या आर्थिक मोबदल्याबद्दल उप सरपंच, सिंधी यांनी केला खुलासा.

कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा केला दावा.
– संगणकीय प्रणालीच्या चुकीने आलेला अधिकचा मोबदला नुकसानग्रस्त शेतकरी करणार परत.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा २० नोव्हेंबर कपाशी सोडून निलगिरी पिकाला मिळालेल्या नुकसान भरपाई बाबत करण्यात आलेली तक्रार ही पूर्णपणे चुकीची असून अल्पभूधारक शेतकऱ्यांवर बिनबुडाचे आरोप लावण्यात आल्याचे सिंधी ग्रामपंचायतचे उपसरपंच रामभाऊ ढुमणे यांनी स्पष्ट केले आहे.
             प्राप्त माहितीनुसार माहे ऑगस्ट–सप्टेंबर महिन्यात सिंधी परिसरात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेतजमीन खरवटून जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाच्या अधिसूचनेनुसार संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून नुकसानग्रस्तांची यादी तयार केली व ती नोटीस बोर्डावर जाहीरही करण्यात आली. यातच आशीष झुरमुरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुनरनिरीक्षण करण्यात आले. या पुनरनिरीक्षणात काही शेतकऱ्यांची नावे कमी करून अतिवृष्टीच्या यादीत टाकण्यात आली होती. या प्रक्रियेत पंचनामा अथवा यादीतील बदलांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा कोणताही हस्तक्षेप नव्हता असे उपसरपंच ढुमणे यांनी स्पष्ट केले.
यादी जाहीर झाल्यानंतर काही शेतकरी वेळेवर उपस्थित राहून आपल्या नुकसानीचा अर्जाद्वारे माहिती दिली. संबंधित मंडळ अधिकारी,महसूल अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करून त्यांच्या नावांचा समावेश यादीत करून अंतिम सूची शासनाकडे सादर केली. यावर झालेल्या चौकशीमध्ये एका अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव चुकीने खरवळ (विमोचन) यादीतही नोंदवले गेल्याने दोन्ही ठिकाणचे अनुदान जमा झाले. मात्र काही अतिरिक्त अनुदान चुकीने जमा झाले असल्याने ते शासनाच्या नियमानुसार परत केले जाणार आहे. यात शासन निधी हडप केल्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. परंतु महसूल विभागाने तपासणी केली असता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा यादीत समावेश असल्याचे निदर्शनास आले. निवडणूका जवळ आल्याने केवळ राजकीय हेतूने तक्रारी व गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा राजकीय वळवळीमुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत असल्याचे सिंधीचे उपसरपंच रामभाऊ ढुमणे यांनी सांगितले आहे.
———————————————

*कोट*
*हितेंद्र गिरसावळे*
*ग्राम पंचायत अधिकारी, मूर्ती*
मौजा सिंधी येथे पूरग्रस्त शेतीचा पंचनामा करून यादी जाहीर झाली. त्यावर आक्षेप आल्याकारणाने पुनर निरीक्षणाच्या आदेशाखाली पंचनामा करून यादी सादर करताना खरवड क्षेत्रात सहा लाभार्थी पीक नुकसान क्षेत्रात २०० लाभार्थी असे असुन शासनाच्या आदेशानुसार यादी तात्काळ सादर करत असताना तीन लाभार्थ्यांचा वेळेवर वैयक्तिक अर्ज आला असता त्यांचा खरवड यादीत समावेश करण्यात आला. तसेच यादी सादर करत असताना पीक नुकसान यादी मधील एका अल्पभूधारक शेतकरी लाभार्थ्यांचे संगणकीय प्रणालीच्या चुकीने खरवळ यादीत सुद्धा नाव आले. यात कुठलाही शासनाचा निधी  हडपण्याचा कसलाही प्रकार झालेला नाही. तसेच २० ते २५ लाभार्थींची नाव सुटले असे चौकशीच्या वेळी ग्रामस्थांनी सुचविले परंतु सदर शेतकऱ्यांचा पुर्वी जाहीर केलेल्या यादीत समावेश आहे असे ग्राम अधिकारी , मुर्ती यांनी प्रतिक्रिया दिली असून जो काही अतिरिक्त मोबदला मिळाला आहे तो शेतकरी परत करणार आहे असेही त्यांनी सांगितले.
———————————————

COMMENTS

You cannot copy content of this page