गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर अदाणीचे चपरासी आहेत . हा चुनाव आमदार बनविण्याचा चुनाव नाहीतर महाराष्ट्राला स्वाभिमान बनवण्याचा चुनाव असल्याचे मत कन्हैया कुमार यांनी भंडारा येथे भंडारा पवनी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार पूजाताई बालू ठवकर (गजभिये) यांच्या प्रचारार्थ मार्गदर्शन करताना सांगितले. महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर अनुसूचित जाती व जमाती अ ब क ड उपवर्गीकरण बाबत महाराष्ट्र शासनाने जी समिती गठीत केली ती समिती रद्द करण्यात येईल व क्रिमिलियरची अट रद्द करण्यात येईल असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. भंडारा पवनी विधानसभेच्या उमेदवार पूजाताई ठवकर यांनी आपल्या मार्गदर्शन सांगितले की, विद्यमान आमदारांनी करोडोचे काम आपल्या क्षेत्राकरिता विकासाकरिता केल्याचा कांगावा करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात भंडारा विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदललेला दिसत नाही. कुठे विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे भंडारा विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याकरता मला निवडून देण्याचे आवाहन पूजाताई बालू ठवकर (गजभिये) यांनी केले. यावेळी भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सुद्धा भंडारा पवनी विधानसभेचे उमेदवार पूजाताई ठवकर यांना लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा चांगल्या मतांनी निवडून देण्याचे आवाहन उपस्थित मोठ्या संख्येने महिला व नागरिकांना महाविकास आघाडीच्या उमेदवार पूजाताई ठवकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी विचार मंचावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, एकीकृत रिपब्लिकन समितीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, युवराज उके, जिया पटेल, रामलाल चौधरी, जयश्री बोरकर, अनिल बावनकर माजी आमदार, जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी, दमानिया पूर्व मंत्री छत्तीसगड, अजय मेश्राम, राजाभाऊ तिडके, धनंजय तिरपुडे, स्वातीताई हेडाऊ, प्रशांत देशकर, महादेव मेश्राम, उपस्थित होते.
Newer Post
बिरसा सेनेचे देवराव भोंगळे यांना समर्थन. Older Post
बिरसा सेनेचे देवराव भोंगळे यांना समर्थन.
COMMENTS