गौतम नगरी चौफेर //रविकुमर बंडीवार : कोरपना तालूक्यातील गडचंदुर येथे ईद-उल-अजहा (बकरी ईद) मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. मौलाना तहसीन रजा यांनी उपस्थित नागरिकांना ईद साजरी करताना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे मार्गदर्शन केले. या वेळी ईदगाह मैदान, मदिना मस्जिद व महम्मदिया मस्जिद येथे नमाज अदा करण्यात आली.
कार्यक्रमास हाजी कादर शेठ, हाजी शब्बीर धाखवला, हाजी मुनाफ खालू, हाजी वसिम ठेकेदार, हाजी हनिफ मावडिया, हाजी सलीम किडिया, रफिक निजामी यांच्यासह माणिकगड माईन व अंबुजा कंपनीचे कामगार तसेच कवठाला, बाखर्डी, लखमापूर, नांदा ,बीबी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गडचांदूरचे भाजपचे नेते सतीश उपलंचीवर आणि नीलेश ताजने यांनी उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा देत आपुलकीने आलिंगन दिले. ठाणेदार साहेबांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवत शांततेत सण पार पडेल याची खात्री केली.
गडचंदुरात विविध धर्मातील नागरिक एकत्र येऊन सण साजरे करत असल्याने सामाजिक ऐक्याचा उत्तम संदेश या सणाद्वारे दिला गेला.

COMMENTS