तब्बल तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या क्षणाने मित्र-मैत्रिणी भारावले

HomeNewsनागपुर डिवीजन

तब्बल तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या क्षणाने मित्र-मैत्रिणी भारावले

गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) – बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा आणि शालेय जीवनातील सोनेरी क्षण पुन्हा अनुभवणारा जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवाळपूरच्या १० वी इयत्ता 1995-96 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. “ती शाळा – ते दिवस : जागर सोनेरी क्षणांचा” या शीर्षकाखाली भरलेल्या या विशेष सोहळ्याने सर्व उपस्थितांच्या मनात भावनांचा कल्लोळ निर्माण केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक चेलकुलवार सर होते, तर डांगे सर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बोंडे सर, पाकमोडे सर, धाबेकर सर व बोभाटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे सुरेख संचालन रामकृष्ण रोगे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश राऊत यांनी सादर केले व विनोद राऊत यांनी आभार प्रदर्शन केले.

या स्मरणीय सोहळ्याला बॅचमधील अनेक विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले. त्यामध्ये चंदू राऊत, बिपलब डे, हारून सिद्दीकी, जगदीश नावंदर, सुमेंद्र ठाकूर, भास्कर गोंडे, सुभाष खोके, विनोद बंडेकर, लता नगराळे, सीमा फालक, योगिता पुणेकर, ज्योती बिलोरिया, गिरजा लोहे, माया गोंडे, मंजुषा ठमके, वैशाली लोहे, वैशाली रोक्कमवार, भावेंद्र परचाके, मोरेश्वर वराटकर, दत्ता उपरे यांच्यासह एकूण 60 विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम रोगे, हारून सिद्दीकी, बिपलब डे, सुमेंद्र ठाकूर, विनोद बंडेकर, प्रशांत नवले यांचे अथक परिश्रम लक्षणीय ठरले.

हा पुनर्मिलन सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो बालमित्रांच्या मनाचा हळवा स्पर्श होता. जिथे काळ थांबलेला भासला आणि आठवणींनी नव्याने गोंजारले..

– राम रोगे, माजी विद्यार्थी

COMMENTS

You cannot copy content of this page