विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नवीन कार्यकारणी गठीत..

HomeNewsनागपुर डिवीजन

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नवीन कार्यकारणी गठीत..

गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा) – विमाशी संघाचे प्रांतीय सरकार्यवाह आमदार श्री सुधाकरराव अडबाले यांचे मार्गदर्शनाखाली राजुरा तालुका ग्रामीण व शहर कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले. दिनांक 28 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कार्यक्रम पार पडला.यामध्ये शहर अध्यक्ष म्हणून राजू डाहूले तर ग्रामीण अध्यक्ष म्हणून नितीन ठाकरे यांचे बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाचे सचिव जगदीश जुनघरी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉक्टर राजेश खेरानी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, ग्रामीण कार्यवाह दीपक धोपटे, उपाध्यक्ष आनंद चलाख, सहकार्यवाह प्राचार्य आसमा खान, निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा सहकार्यवाह हरिहर खरवडे, मुख्याध्यापक नानाजी डाखरे, मेघाताई धोटे यांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या उपस्थितीत तालुका कार्यकरिणी गठित करण्यात आली. शहर कार्यकारणी मध्ये कार्यवाह म्हणून बाळा गोहोकर, उपाध्यक्ष म्हणून गजानन खामनकर, प्राध्यापक बंडू मालेकर, मोहनदास मेश्राम, कुमारी अर्चना गावंडे, सहकार्यवाह म्हणून गिरीश कडूकर, विजय धानोरकर, संजय गोखरे, मेघाताई धोटे, कोषाध्यक्ष म्हणून प्राध्यापक नरेश नुगुलवार, संघटक म्हणून भास्कर फरकाडे, रुपेश चिडे,जयश्री साळवे, सौ. शेरकी यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून उपप्राचार्य डॉक्टर राजेश खेरानी, प्राचार्य छायाताई मोहितकर, प्रसिद्धीप्रमुख म्हणून बादल बेले व अजय किन्हेकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
ग्रामीण कार्यकारणीच्या उपाध्यक्षपदी अभिजीत काकडे, किनाके, प्राध्यापक गणेश लोहे, प्रा.सौ.लता मेश्राम, कार्यवाह म्हणून संदीप पिंपळकर, सहकार्यवाह म्हणून मेश्राम, रवींद्र गोरे, ऊराडे, प्रा.सौ.वर्षा फुटाणे, कोषाध्यक्ष म्हणून समीर वानखेडे, संघटक म्हणून दासरवार, अशोक शिडाम सर, सल्लागार म्हणून मुख्याध्यापक नानाजी डाखरे,श्री थिपे प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुनील गौरकार, नितीन टोंगे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड, माजी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, सुरेंद्र अडबाले, दीपक धोपटे, महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाचे सचिव जगदीश जूनघरी याने संघटनेचे महत्त्व विशद केले व नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात. प्रास्ताविक उपाध्यक्ष आनंद चलाख, यांनी केले. संचालन राजू डाहूले यांनी केले तर आभार बाळाभाऊ गोहोकर यांनी मानले.

COMMENTS