गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ येथे आज दिनांक 12 मार्च 2025 ला सायंकाळी 7.30 वाजता बुद्ध जयंती निमित्त कॅण्डल मार्चचे आयोजन वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ येथून करण्यात येऊन गावातील प्रमुख मार्गाने शांती मार्च काढण्यात आला .सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाकारुणिक, विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन विनोद बावणे पीएसआय , डॉ स्वप्नील खोब्रागडे, डॉ गणेश मेश्राम, वैशाली बुद्ध विहाराचे अध्यक्ष मुन्ना बोदलकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, ग्रामपंचायत सदस्य विपीन टेंभुर्णे, कल्पना जांभुळकर, विकास टेंभुर्णे, सुनील लांजेवार, हिरालाल थंडाईत, अमोल थुलकर या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील असंख्य बौद्ध उपासक, उपासिका यांनी कॅण्डल मार्च मध्ये सहभाग घेतला.

COMMENTS