गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – दिनांक 27/12/2025 रोज शनिवारीला सामुदायिक प्रार्थना मंदिर सिंदेवाही येथे प्रमाणपत्र तथा मार्गदर्शन सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम सामुदायिक प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुराचे सेवाधिकारी तथा मध्यवर्ती प्रतिनिधी मोहनदास मेश्राम यांनी ” ग्रामसुधारणेचा मूलमंत्र I सज्जनांनी व्हावे एकत्र l संगठना हेची शक्तीचे सूत्र I ग्रामराज्य निर्माण करीI आजच्या तंत्रज्ञान व धकाधकीच्या युगात समाज सुस्थितीत राहण्याकरिता गुरुदेव सेवा मंडळाचे संगठन आणि वंदनीय महाराजांच्या विचारा शिवाय कोणताही पर्याय नाही असे मत व्यक्त केले. मध्यवर्ती प्रतिनिधी ग्रामगीतचार्य मारोती सातपुते यांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्व विषद केले . सामुदायिक प्रार्थना म्हणजे शांती नानदण्याचे माध्यम असून विश्वशान्ती निर्माण करण्याचे हे स्वप्न महाराजांचे पूर्ण होईल असे मत व्यक्त केले.म्हणून सामुदायिक प्रार्थनेत नित्य नेमाने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तर गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुराचे प्रसिद्धी प्रमुख देव वांढरे यांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या विचाराशी जुळणे म्हणजे आत्मोन्नती करणे होय असे विचार व्यक्त केले. नवरगाव, ब्रम्हपुरी, मूल, राजोली, सिंदेवाही येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या आठ शाखेचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले .या कार्यक्रमाचे नेतृत्व व आयोजन सौ.आशाताई चिमुरकर, व सौ.विभाताई कामडी यांनी केले.या कार्यक्रमाला सौ.उज्वला वारजुरकर, सौ.उपासे ताई, सौ. मंजुषा बिरेवार, सौ माया येरेवार, सौ.अनिता गावतुरे, सौ. वैभवी मेश्राम, सौ. सुवर्णां येनचेलवार, सौ. छाया येनचलवार, सौ. जयश्री राखडे, सौ. प्रतिभा राखडे, सौ. अस्मिता शेंडे, सौ. स्वर्णा बावणे, सौ.सुमित्रा सहारे, सौ.वर्षा लोखंडे, सौ.मंगला उरकुडे, सौ.सुनंदा उरकुडे, सौ.सुनीता सानपैसे, सौ . मोनाली साहू, सौ.कल्पना बुरिले, सौ.अल्का कावळे, श्री.वसंत सिडाम, श्री.युवराज जीवतोड, श्री. खेमराज तिडके, श्री.माधवराव आदेश्री. विजयराव सोयाम, श्री रुना श्रीराम, रमेशराव कामडी, प्रकाश चिमूरकर, सिंदेवाही येथील समस्त गुरुदेव उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सौ. आशाताई चिमुरकर, तर आभार सौ. विभाताई कामडी यांनी केले.राष्ट्रवंदनेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



COMMENTS