कार्यकर्ता हाच भारतीय जनता पक्षाचा कणा :- देवराव भोंगळे

HomeNewsनागपुर डिवीजन

कार्यकर्ता हाच भारतीय जनता पक्षाचा कणा :- देवराव भोंगळे

शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश.

गौतम नगरी चौफेर (गडचांदूर ) :- भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वोभोमिक विकासाचे काम करीत आहे. अनेक विकासात्मक योजना सरकार राबवित असून तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत कशा पोचता येईल याचा प्रयत्न मोठ्या हिरीरीने करत आहे. भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत सर्वांना सोबत घेऊन चालणार पक्ष असून कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक समजल्या जातो. पक्षासाठी रात्र – दिवस झटणारा कार्यकर्ताच हाच पक्षाचा कणा आहे. राष्ट्रप्रथम हे ब्रीद मानून लोककल्याणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय जनता पक्षात सर्वांचेच स्वागत आहे. भाजपच्या विकासवादी अजेंड्यावर काम करून आगामी काळात या भागात भाजपाला मजबुत करण्यासाठी हे सर्वजण पुर्ण शक्तीनिशी प्रयत्नरीत राहतील, असा विश्वास पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी देवराव भोंगळे यांनी बोलतानी व्यक्त केला.

कोरपना तालुक्यातील मौजा कढोली (खुर्द), आसन (खुर्द) बोरी-नवेगांव व मायकलपुर येथील शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी देवराव भोंगळे यांचा प्रमुख उपस्थितीत उपसरपंच विनोद डोहे, यांचा नेतृत्वात माजी सरपंच निर्मला मरस्कोल्हे, वंदना चायकाटे यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री सतीश उपलेंचवार, महामंत्री प्रमोद कोडापे, रमेश मालेकर, पुरुषोत्तम भोंगळे, शशिकांत आडकिणे, महेश शर्मा, किशोर बावणे, हितेश चव्हाण,आशिष ताजणे,अशोक झाडे, विश्वंबर झाम, धम्मकिर्ती कापसे, रवी बंडीवार, जगदीश पिंपळकर, प्रदिप पिंपळशेंडे, गजानन भोयर, प्रमोद व्हराटे, गणेश बांगडे, वंदना चायकाटे, सौ. मरस्कोल्हे, गुलाब आस्वले, योगेन्द्र केवट, सतिश जमदाडे, सचिन आस्वले, भाऊराव कुळमेथे, गणेश देरकर, रवी टेकाम, सागर धुर्वे, प्रमोद शेंडे, हर्षल चामाटे, आशिष ढुमणे, संजय जुमनाके व अविनाश नामपल्ली यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.

COMMENTS