– स्टेला मेरिस कॉन्व्हेन्ट स्कूल बामणवाडा येथे वार्षिक क्रीडा उत्सव संपन्न.
गौतम नगरी चौफेर बदल बेले राजुरा २३ डिसेंबर स्टेला मेरिस कॉन्व्हेन्ट स्कूल बामणवाडा येथे नुकतेच वार्षिक क्रीडा सांस्कृतिक उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मदर कृपा मारिया डी एम यांची उपस्थिती होती. तर सत्कारमूर्ती म्हणून राकेश तिवारी, सरचिटणीस, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन, मनोज गौरकर, उप शिक्षणाधिकारी जी.प. चंद्रपूर , भारती पाल, सरपंच ग्रा.पं. बामनवाडा , बादल बेले, सचिव, राजुरा तालुका पत्रकार संघ , प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका सिस्टर सजीवा डी एम, सिस्टर जोएल जोस डी एम, व्यवस्थापक लुसी जोसेफ डी एम यांची उपस्थिती होती. यावेळी मनोज गौरकर यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. तसेच विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख शिक्षक भास्कर फरकाडे व शिक्षिका भार्गवी कोडाली यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. “उडाण” या थीमचे उद्घाटन लक्षवेधी ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी रोशनी घोगरे, वैष्णवी वडस्कर, श्रद्धा वाघमारे, सृष्टी जाधव यांनी केले. प्रास्ताविक सिस्टर जोएल जोस यांनी केले. शाळेचा प्रगती रिपोर्ट विद्यार्थिनी अवनी मालखेडे, काव्या वांढरे, दीप्तांशु रामटेके, खुशबू शर्मा, पलक डुकरे, आर्यन थेरे, चेतन करमणकर, संकल्प लाटेलवार, आदिती राठोड यांनी वाचन केले. पालकांचे रस्सीखेच, विद्यार्थ्यांचे विविध सांघिक, वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

———————————————
मनोज गौरकर, उप शिक्षणाधिकारी जि.प.चंद्रपूर
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणे महत्त्वाचे असून शिक्षक तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ओळखून त्यांना पुढे आणणे महत्वाचे आहे. त्यांना नेहमी सकारात्मक प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत गौरकर यांनी व्यक्त केले.
———————————————

राकेश तिवारी, सरचिटणीस महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन
पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले शालेय जीवनात खेळांचे अतिशय महत्वाचे स्थान असून शारीरिक मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाची व खेळांची आवश्यकता असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले.
——————————————— यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता स्टेला मेरिस कॉन्व्हेन्ट स्कूल च्या विद्यार्थि, शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमृता सावरकर या विद्यार्थिनीने केले.


COMMENTS