– रेतिची किमत १५०० ते २००० सांगोडा गावासाठी
गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) – कोरपना आदिवासी तालुक्यातील सांगोडा घाटातून दिवसा रेतिची चोरीकरून सांगोडा गावात फक्त १५०० ते २००० रूपयात एक ट्रॉक्टर रेती दिली जाते आणी सांगोडा परिसरात हिच रेती ८००० रूपये ट्रॉक्टर विक्री केली जाते, मागील काही दिवसापासून सांगोडा घाटातून अवैध रेती पटवारी व गावकऱ्यांना हातासी धरून जोमाने रेती तस्करी सुरु आहे. सध्या तालुक्यातील वनोजा आणी सांगोडा घाटावरून ही अवैध रेतीची तस्करी सुरू आहे. परंतु, महसूल विभागाकडून अद्यापही कोणतेही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रेती तस्कारांची हिंमत वाढलेली असल्याचा आरोप होत आहे. यादरम्यान महसूल अधिकारीच जर रेती तस्करांसोबत हात मिळवणी करीत असेल तर याला आळा घालणार तरी कोणा ? असा प्रश्न व्यक्त करण्यात येत आहे. याकडे चंद्रपूर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देवून रेती तस्करांकडून दिवस-रात्र रेती उपसा सुरू असून महसूल विभागाच्या संगणमताने, असल्याचे नागरीकात बोलले जात आहे, सांगोडा गाव कोरपना पोलीसाकडे तर सांगोडाफाटा लगत शेतसीवार गडचांदूर पोलीसाकडे आहे, दोन बायका फजिती ऐका सांगावे लागेल, कोरपना तालूक्यातील सांगोडा वाळू घाटपरिसरातील. हा सावळा कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे, सबंधित अधिकाऱ्यानी वेळीच तस्करांच्या मुसक्या आवरावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



COMMENTS