गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – शेती करीत असताना विविध अडचणीवर मात करून मग त्यामध्ये भौगोलिक परिस्थिती वातावरण, ऊन, वारा, पाऊस कीड रोग अतीवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाऊन एका दाण्याचे हजारो दाणे पिकवण्याचे सामर्थ्य हे आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांमध्येआहे आणि म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा बळीराजा*अशी उपमा दिलेली आहे.
शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ असून तो आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून जगाचा आणि सजीव सृष्टीच्या पोशिंदा आहे. असे प्रतिपादन डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत गाव पातळीवरील प्रशिक्षणामध्ये भंडारा तालुक्यातील मौजा पंढराबोडी येथे एक दिवशीय प्रशिक्षणा च्या अनुषंगाने शेतकऱ्यांना प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी नामदेव काशीद यांनी केले.
दिनांक ४ डिसेंबर २०२४ ला डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत मौजा पांढराबोडी येथे गाव पातळीवरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गात उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा वापर करून पर्यावरणाला हानीन पोहोचता मातृभूमीचे रक्षण करून शेवटच्या घटकाला ग्राहकांना विषमुक्त अन्न ज्या पुरवठा करणे म्हणजे नैसर्गिक शेती होय डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत भंडारा तालुक्यामध्ये 50 हेक्टर प्रमाणे वीस क्लस्टरची स्थापना करून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, भंडारा अंतर्गत करून त्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करून शेतकरी हा केवळ उत्पादक न राहता तो विक्रेता कसा होईल त्याला उत्पादित माल कसे विकता येईल याबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.या नैसर्गिक शेती मिशन अभियानाची व्याप्ती संकल्पना श्री. सतीश वैरागडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणातला भंडारा यांनी समजावून सांगितले.
प्रशिक्षणाला उपस्थित कृषी पर्यवेक्षक म्हणून अरुण हारोडे यांनी नैसर्गिक शेती मिशन अभियानांतर्गत शेत बांधावरील प्रयोगशाळा आणि दहा ड्रम थेरीया माध्यमातून गावातील नोंदणीकृत असणाऱ्या शेतकरी गटातील शेतकऱ्यांना दहा ड्रम थेरी च्या माध्यमातून जैविक नैसर्गिक संसाधन केंद्र याची निर्मिती करून शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेच्या निविष्ठा उपलब्ध करून शेत पिकावर होणारा रासायनिक कीटकनाशकाच्या तणनाशकाच्या आणि रासायनिक खतांचा यावरील खर्च टाळून उत्पादनासाठी लागणारा खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे असे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत नेहल उरकुडकर तंत्र सहायक यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना बिजामृत, जमिनीच्या माती नमुना काढणे, माती नमुन्याच्या अहवालानुसार शिफारशीत खतांच्या मात्रा देणे, बीज प्रक्रिया करन्याकरिता बिजामृत, दशपर्णी अर्क, एस नाईन कल्चर, गांडूळ खत, अग्नीअस्त्र, ब्रह्मास्त्र, इत्यादी निविष्ठा कशा तयार करायच्या याचे तंतोतंत उपस्थित शेतकऱ्यांना सादरीकरण करून मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणाला प्रामुख्याने उपस्थित पद्माकर चकोले प्रगतिशील शेतकरी यांनी आपल्या स्वतःच्या शेतावर निविष्ठा कशा तयार करायचे त्यामध्ये सप्त धान्याकुर, जीवामृत, गोकृपा अमृत, एस नाईन कल्चर इत्यादी निविष्ठा करून मी यावर्षी वीस एकरावर जैविक कीटकनाशकांच्या, जैविक खतांच्या वापर करून शेती केली. आणि त्यापासून मला कुठलाही खर्च आलेला नसून यामुळे माझ्या उत्पादनात घट झाली नसून विषमुक्त रसायनमुक्त करण्याची आणि जमिनीची आरोग्य सुधारण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची असून प्रत्येकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन केले.
सदर प्रशिक्षण वर्गाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य गायत्री वाघमारे, गावातील प्रथम नागरिक सरपंच जगन्नाथ वाघमारे आणि परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नैसर्गिक शेती गटातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण वर्गाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी केले तर आभार एस. एच. केदार कृषी सहाय्यक पांढराबोडी यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.
COMMENTS