गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – मनात सामाजिक बांधिलकी जपण्याची इच्छा असेल तर जीवनात पैसा असणेच गरजेचे नाही. हवी मदतीची मानसिकता या गोष्टीचा प्रत्यय पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील स्वतः एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून मात्र आपल्या वाढदिवसाला दिव्यांगांना मदत करून वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा पायंडा चेतन पडोळे याने घातला.
चेतन स्वतः शिक्षण पूर्ण करून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. तसेच मंगली ग्रामपंचायत चे सदस्य गावचे आजच्या आधुनिक काळात युवा तरुण पिढी केक, पार्टी, जल्लोष आणि मद्यधुंदीच्या आहारी जात असल्याचे चित्र बघायला मिळते. परंतु, युवा पिढीचे वैचारिक क्रांती एका विरुध्द प्रवाहात दिसून येते. सामाजिक अस्मितेची जाणीव करत चेतन पडोळे यांनी कोणत्याही प्रकारच्या जल्लोष न करता अपंग, दिव्यांग विद्यार्थ्यांना शर्ट’ आणि पॅन्ट चे वाटप करून केला वाढदिवस साजरा. गरजू व्यक्तींना अंगावर घालायला नवीन कपडे मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर असणारे हसू हेच चेतनच्या वाढदिवस साजरी करणाच्या आनंदापेक्षा कितीतरी महत्वाचे आहे. हे त्याच्या कृतीतून दाखवून दिले. यावेळी त्याच्यासोबत सामाजिक जाणीवेने प्रेरीत. चेतन पडोळे ग्रामपंचायत सदस्य , चंद्रशेखर पडोळे निर्वण पडोळे सोनू पडोळे मनिष गभणे, गणेश खांदाडे विकी रामटेके टिकाराम वैद्य स्वप्निल पडोळे गुरु काटेखाये इत्यादी मित्रपरीवार उपस्थित होते.
COMMENTS