भद्रावती तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची अर्जनविसांकडुन आर्थिक लूट.

HomeNewsनागपुर डिवीजन

भद्रावती तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची अर्जनविसांकडुन आर्थिक लूट.

मुद्रांकावर मजकूर लिहण्यासाठी मोजावी लागले अडिचशे रुपये


गौतम नगरी चौफेर (राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी) भद्रावती : तहसील कार्यालय परीसरातील अर्जनविसांकडुन गोरगरीब शेतकऱ्यांची आर्थिक लुट केल्या जात आहे. स्टॅम्प पेपरवर मजकूर लिहुन घेण्यासाठी अडीचशे रुपये आकारले जात आहे. अर्जनविसांकडुन शेतकऱ्यांची राजरोस पणे  सर्रास आर्थिक लूट केली जात असतांना देखील महसूल विभाग अधिकारी यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
   यामुळे या प्रकाराला अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याची शंका येत आहे. सध्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे अनुदान मिळणे सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना सातबारावर एकापेक्षा अधिक नावे असतात त्यांना अनुदान जमा होण्यासाठी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते यासाठी हे अर्जनविस स्टॅम्प पेपरचे आवश्यक तो मजकूर लिहुन देण्यासाठी शेतकऱ्यां कडून तब्बल अडिचशे रुपये वसूल केल्या जात आहे. यात गोरगरीब शेतकऱ्यांची मोठि आर्थिक लूट होत आहे. वास्तविक स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना शासनाकडून कमिशन मिळते मात्र स्टॅम्प पेपर विक्रेतेही जास्तीची किंमत आकारुन सर्रास विक्री करीत आहे. याशिवाय स्टॅम्प पेपरवर मजकूर लिहुन घेण्यासाठी अडिचशे रुपये आकारले जात आहे. यासंबंधी अनेक वेळा तक्रार करुनही महसूल विभागांचे अधिकारी याकडे डोळे झाक करीत आहे. या प्रकरणाची शहनिशा करून सबंधित अधाकऱ्यांनी दोषी अर्जनविसांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. महसूल विभागाने याकडे लक्ष न दिल्यास यासंबंधी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

COMMENTS