गौतम नगरी चौफे बादल बेले राजुरा (ता. राजुरा) :
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व तालुका आरोग्य कार्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात हिमोग्लोबिन व सिकलसेल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन उप प्राचार्य डॉ. आर आर खेरानी यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की व सारिका साबळे तसेच शिक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे सामन्यता मुलींच्या रक्तात हिमोग्लोबिन चे असलेले कमी प्रमाण समोर त्यांच्या आयुष्यात अडचणीचे ठरू शकते त्यामुळे तपासणी करून वेळीच उपचार करता येईल यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे रक्त नमुना घेऊन तपासणी साठी पाठविण्यात आले, यासाठी स्टाफ नर्स शोभा कटलावार व कांचन सावे यांचे सहकार्य लाभले, या शिबिराद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यजागृती, अॅनिमिया व सिकलसेल विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.



COMMENTS