वैशाख पौर्णिमेला चिखली येथे बुद्ध मूर्ती व लुंबिनी  बुद्धविहाराचे 12 मे ला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन

HomeNewsनागपुर डिवीजन

वैशाख पौर्णिमेला चिखली येथे बुद्ध मूर्ती व लुंबिनी  बुद्धविहाराचे 12 मे ला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा) – पवनी तालुक्यातील अड्याळ पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली येथे 12 मे 2025 ला  वैशाख पौर्णिमा दिनाचे औचित्य साधून भव्य बुद्ध मूर्ती व लुंबिनी बुद्ध विहार अनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन ,मान्यवरांच्या सत्कार व मार्गदर्शनाचा कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्य भदन्त धम्मचारी जीनसागर मुंबई , सहउद्घाटक म्हणून पूज्य धम्मचारी श्रद्धा चित्ता मुंबई यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाऊराव हुमणे माजी मुख्याध्यापक हे राहणार आहेत .प्रमुख अतिथी म्हणून सुरेश नीतनवरे नागपूर ,जिल्हा परिषद सदस्या पूजाताई हजारे ,युवराज वासनिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पवनी, कल्याणी  कुर्जेकर पंचायत समिती सदस्य पवनी, अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील ,ग्रामपंचायत अधिकारी पौर्णिमा साखरे ,डॉ. गणेश मेश्राम ,डॉ. संघरत्ने ,मन्साराम गजभिये, आत्माराम मेश्राम, टिकाराम शेंडे, राजेंद्र गेडाम ,विजय शिंदे, अरविंद धारगावे, संजीव गजभिये ,रविचंद देशपांडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बौद्ध पंच कमिटी चिखली चे अध्यक्ष अनिल  हुमने, सदस्य संजय देशपांडे, महंता देशपांडे सरपंच चिखली, ज्योतिष तिरपुडे ग्रामपंचायत सदस्य, विनोद शिंदे यांनी केलेले आहे.

COMMENTS