इंटरनॅशनल शितो रयु कराटे कुबुडो काई ऑर्गनायझेशन चंद्रपूरच्या कराटेपटूंनी नेपाळमधील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत गाजवले मैदान.

HomeNewsनागपुर डिवीजन

इंटरनॅशनल शितो रयु कराटे कुबुडो काई ऑर्गनायझेशन चंद्रपूरच्या कराटेपटूंनी नेपाळमधील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत गाजवले मैदान.

गौतम नगरी चौफेर //बादल बेले राजुरा // चंद्रपूर ३१ मे  चंद्रपूर परिसरातील कराटेपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. २५ ते २७ मे २०२५ रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत (International Karate Championship) चंद्रपूरच्या एकूण ९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला पदकांची कमाई करत महाराष्ट्राचे तसेच भारताचे नाव उज्ज्वल केले.
ही स्पर्धा नेपाळ शोतोकॉन कराटे असोसिएशन यांच्या आयोजनाखाली पार पडली. नेपाळ शोतोकॉन कराटे असोसिएशन चे तांत्रिक संचालक  शिहान शीना कतसुतोशी, महासचिव सेन्साई श्याम शेर्पा. या स्पर्धेत विविध देशांतील आणि राज्यांतील कुशल कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. अशा कठीण स्पर्धेत चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, कौशल्य आणि संयम स्तुत्य आहे.
या विद्यार्थ्यांना शिहान संतोष कडपेवाले आणि सेन्साई  राकेश कडपेवाले , रमेश केडारी ,साजन कडपेवाले मोहित कुमार साहू , नेहा बसेशंकर व अमर कडपेवाले यांचें मोलाचे मार्गदर्शन लाभले.
निर्मल नयनपाल दुधे- रौप्य पदक
स्वरा संभाजी सुरनेर–कांस्य पदक
उत्कर्ष नरेंद्र डवरे– कांस्य पदक
लावण्य विलास लोनगाडगे–कांस्य पदक, निधी गणेश कृष्णपल्लीवार–कांस्य पदक
संस्कृती आनंद कावळे -सहभाग
अनुष्का गणेश नवाळे – सहभाग
क्रीष्णा अरुण चांदेकर-सहभाग
शकील कलाम अन्सारी-सहभाग
या सर्व विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांतील काता आणि कुमिते या प्रकारांत आपली कुशलता दाखवत स्पर्धकांमध्ये उत्कृष्ट ठरले.
स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुरातील कराटे संस्कृतीला नवसंजीवनी मिळाली असून ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.  ट्रॅडिशनल शितो रियू कराटे अँड कुबोडो ऑर्गनायझेशन भारत चे अध्यक्ष दस्तगीर शेख सर, उपाध्यक्ष संतोष कडपेवाले ,महासचिव क्रीष्णा ढोबळे सर. शिहान व सेन्साई म्हणाले,“या मुलांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणे हेच मोठे पाऊल असते, पण त्यांनी पदके जिंकून दाखवल्याने आनंद द्विगुणित झाला आहे. पुढील टप्प्यांसाठी आम्ही अधिक जोमाने तयारी करणार आहोत.”
या यशात विद्यार्थ्यांची निष्ठा, पालकांचे पाठबळ, शाळा आणि स्थानिक संस्थांची साथ यांचा मोलाचा वाटा आहे. चंद्रपूर परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक विजेते घडले जाणे ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे.संस्थेचे  अध्यक्ष (मास्टर)मान.श्री. संतोष रतन कडपेवाले उपाध्यक्ष रमेश कोडारी आणि सचिव मोहीतकुमार साहू यांनी विद्यार्थ्यांना  शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कोचेस व पालकगण  यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाकरिता शुभेच्छा दिल्या.

COMMENTS