..अखेर आरोग्य विभागाने केली साकोली येथील श्याम हॉस्पिटलची पाहणी

HomeNewsनागपुर डिवीजन

..अखेर आरोग्य विभागाने केली साकोली येथील श्याम हॉस्पिटलची पाहणी

– प्रकरण अल्पवयीन मुलीवर डॉक्टरकडून अश्लील कृत्याचे ;

– आरोग्य चमु व पोलीस बंदोबस्तात झाली दवाखान्याचे परिक्षण


गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – ०९ जुलैला एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत डॉ. देवेश अग्रवाल यांनी सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते. याची पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल होताच आरोपी डॉक्टर हा तेव्हापासून फरार आहे. याबाद काल ( शनि. १९ जुलै ) ला आरोग्य विभाग भंडारा चमु सायं. ०७:४५ ला आरोपीचे श्याम हॉस्पिटलचे निरीक्षक व चौकशी करण्यासाठी आले होते. यावेळी  जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आरोग्य विभाग चमुने येथे कागदोपत्री कारवाई केली. यावेळी साकोली पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
                  एका अल्पवयीन १७ वर्षीय दलित मुलीवर ०९ जुलैला डॉ. देवेश अग्रवाल यांनी अश्लील कृत्य केल्याचे साकोली शहरासह जिल्ह्यात संतापजनक पडसाद उमटले होते. आरोपी डॉ. देवेश अग्रवाल हे ११ दिवसांपासून अद्यापही फरारच आहे. या घटनेनंतर पोलीस व आरोग्य विभाग चांगलेच अलर्ट झाले असून शनिवारी ता. १९ जुलैला सायं. ०७:४५ ला साकोली राष्ट्रीय महामार्गावरील “श्याम हॉस्पिटल व ट्रॉमा केअर” याची चमुने पाहणी केली व तसा अहवाल वरीष्ठांना सादर करण्याची कारवाई केली. याप्रसंगी साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित्रा साखरकर, पोलीस नायक चंदू थेर, संदीप रोकडे, उपविभागीय पोलीस कार्यालयाचे प्रशांत गुरव व अन्य पोलीस कर्मचारी या कारवाईत हजर होते. यावेळी महामार्गावर हॉस्पिटल परीसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS

You cannot copy content of this page