बहुजनानो केव्हा तुम्हा कळणार

HomeNewsनागपुर डिवीजन

बहुजनानो केव्हा तुम्हा कळणार

-कविता गौतम धोटे गायक , यशवंत  गायकवाड (गौतम नगरी चौफेर) –

ना भ्याला ,  कुणाला  ,असा वाघ पाहिजे
तुझ्या विचारा  त ,  भिम रक्त  पाहिजे (धू

नको आम्हा क्रांती, नको आम्हा  युध्द
करूणामय करू (देश) आठवरे बुद्ध
विद्येच्या लाटेवर , ज्ञाणाचा दे .रे मार
विचारवंत होरे,  करून बुध्दी चा वार
संघाचा बुध्दि चा,  विचार पाहिजे  (१ तुझ्या –

नमुद करून  घेरे, ,बुध्दाच तत्वज्ञान
संकटे ते येतील ,  तारेल सविधान
विचारा आधिन , आरक्षण मिळणार
बहुजनानो केव्हा , तुम्हा हे कळणार
.आचार . विचार , समजला पाहिजे (२ तुझ्या

दिल्लीचे ते तक्त , काबीज करण्या
हाती हात घ्यारे , एक जुटकरण्या
विचारांचा लढा , आचारांने देवू
डोक्यातले  वैर , आचारात घेवू
विद्येचा ज्ञाणाचा, आधार पाहिजे (३ तुझ्या

धम्मापेक्षा कुणी , नाही आज श्नेष्ठ
व्हावे गौतमा  रे ,  एक संघ निष्ठ
गुलामिचे बंध , तोडिले सयंमाने
समतेचे नाते ,  जोडिले भिमाने
हा विचार .हा आचार घेतला पाहिजे (४ तुझ्या

.कवी. पत्रकार. गौतम धोटे
गायक यशवंत गायकवाड
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
      💙गौतम नगरी चौफेर 💙
🌻💚विदर्भाचा वीर न्यूज नेटवर्क💚🌻
🥀🥀🥀🥀🥀,💙🥀🥀🥀🥀🥀

COMMENTS