गौतम नगरी चौफेर (यवतमाळ (संजीव भांबोरे) – जिल्ह्यातील मागील 40 वर्षाचा राळेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा आढावा घेतला असता, विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती विविध चॅनल द्वारे प्रसारित झाल्या .विविध चॅनलच्या माध्यमातून या मतदारसंघातील जनतेच्या मुलाखती घेण्यात आल्या. या सर्वांचा आढावा घेतला असता मतदार संघामध्ये माजी ,आजी यांनी विकासाचा कोणताही ठोस कार्यक्रम राबविला नाही .परिणामी हा मतदार संघ विकासापासून वंचित राहिला आहे. म्हणून 2024 च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा तिसऱ्यांदा पराभव होऊ नये म्हणून विजयी उमेदवार कोण राहील या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने चिंतन करणे सुरू केलेत. या मतदारसंघांमध्ये नवीन सक्षम उमेदवार पाहिजे आहे असे मतदारसंघातील जनता व सामाजिक कार्यकर्त्यांना वाटू लागले .जुन्यांची मक्तेदारी पक्षाने संपुष्टात आणावी हाच सुतोवाच यातून निघतो आहे. म्हणून पहिल्यांदाच डझन भरच्यावर उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यामध्ये अशोक मारुती मेश्राम हे काँग्रेसचे उमेदवारी मागणारे सक्षम उमेदवार ठरले. त्यांनी या मतदारसंघांमध्ये जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास केला .जनतेचे प्रश्न समजून घेतले .जनतेच्या विकासाचा अनुशेष कुठे कसा व किती आहे याचा पुरेपूर अभ्यास करून ग्रामीण भागामध्ये मतदार संघामध्ये मतदारांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले .त्यांच्या समस्या कशा सोडविता येईल या दृष्टिकोनातून सक्रिय झाले अनेक छोटे मोठे प्रश्न त्यांनी प्रत्यक्ष फोन द्वारे सोडविले आणि मुख्य प्रश्न शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगारां च्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल .त्याचे नियोजन करून त्याची एक ब्ल्यू प्रिंट तयार करून पक्षश्रेष्ठी व वेळोवेळी पक्षश्रेष्ठीचे आदेशावरून येणारे निरीक्षक पदाधिकारी यांच्या आडवा बैठकीमध्ये सादर करून एक सक्षम उमेदवार म्हणून आपली छाप कायम केली आणि वरिष्ठांनी या बाबीला हेरून एम सी डब्ल्यू सी चे बैठकी मध्येअशोक मारुती मेश्राम हेच काँग्रेसचे विजयी उमेदवार होऊ शकते या बाबीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. अशोक मारुती मेश्राम हेच काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार राहतील असे सुतोवाच केले आहे अशोक मारुती मेश्राम यांची उमेदवारी काँग्रेसला विजयी मिळवून देणारी ठरेल असा सूर राळेगाव विधानसभा मतदारसंघातून ऐकू येत आहे त्याचाच परिपाक म्हणून अशोक मारुती मेश्राम यांनाच काँग्रेस पक्षाची उमेदवारी कायम करण्यात आल्याचे समजते. दोनदा पराभूत झालेले आदरणीय वसंत पुरके सर आणि नरेंद्र पोयाम हे उमेदवारी मागण्याच्या रेसमध्ये होते.
नरेंद्र पोयाम हे चार वर्षांपूर्वी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होऊन त्यांनी या मतदारसंघांमध्ये चार वर्षांमध्ये कोणतेही सामाजिक उपक्रम राबविले नाही ते निष्क्रिय राहिले त्यामुळे त्यांचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला नाही .
तसेच दोनदा पराभूत झालेले आदरणीय वसंत पुरके सर यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न जोरात चालविले होते परंतु काँग्रेस पक्षाची तिसऱ्यांदा पराभव स्वीकारण्याची तयारी नसल्यामुळे ते स्पर्धेतून बाद झाल्याचे ऐकण्यात आहे काँग्रेस पक्षाला विजयी उमेदवार म्हणून अशोक मारुती मेश्राम च्या माध्यमातून सक्षम उमेदवार मिळाल्याचं पक्षश्रेष्ठींनी मान्य केलं म्हणून अशोक मारुती मेश्राम हेच काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कायम झाल्याचे समजते.
COMMENTS