मागील वीस वर्षापासून गायनाची छाप सोडणारा कलावंत सय्यद मन्सूर सय्यद अख्तर अली .

HomeNewsनागपुर डिवीजन

मागील वीस वर्षापासून गायनाची छाप सोडणारा कलावंत सय्यद मन्सूर सय्यद अख्तर अली .

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा –
बालपणापासूनच गायनाची आवड, अनेक मंचावर आपली कलाकृती सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. आपल्या अप्रतिम गायन शैलीने कव्वाली, आर्केस्ट्रा यासारख्या कार्यक्रमात अनेक कार्यक्रम सादर केले. असा हरहुन्नरी कलावंत म्हणजे राजूरा शहरातील सय्यद मन्सूर सय्यद अख्तर अली.
अतिशय गरीब कुटुंबात सामान्य परिस्थितीमध्ये वाढलेला कुठलेही संगीताची पार्श्वभूमी नसलेला हा कलावंत मागील वीस वर्षापासून गायकी क्षेत्रात आपलं नाव उज्वल करीत आहे. वयाच्या 15 व्या वर्षापासून तो स्टेजवरील कार्यक्रम करीत आहे.कव्वाली, आर्केस्ट्रा यामध्ये सुरेल आवाजात गीते गाताना रसिकांना मंत्र मुग्ध करतो. सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमात त्याचा नेहमी सहभाग असतो. स्वयंसेवी संस्था, शाळा कॉलेज सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही गावून मनोरंजन व प्रबोधन करीत असतो. उदरनिर्वाहासाठी आर्थिक कोणतेही मोठे पाठबळ नाही. गायकीच्या बळावर व इतर छोटे मोठे कामे करून कुटुंबाचा गाडा चालवितो. सामाजिक संस्थांद्वारे आयोजित आर्केस्ट्रा, कव्वाली यासारख्या कार्यक्रमातून अप्रतिम कलाकृती सादर करून रसिकांना रिझरवीतो. आतापर्यंत त्याने अनेक कार्यक्रम केलेले आहेत. त्याच्या या कलाकृती बद्दल अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.

COMMENTS

You cannot copy content of this page