गौतम नगरी चौफेर राहुल हंडोरे महाड दि. 4 : रिपब्लिकन पक्षाची निवडणूक युती बाबत महायुतीशी बोलणी सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे बरोबर बोलणी झाली आहेत असे उदगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना रामदास आठवले यांनी महाड येथे रिपब्लिकन पक्षाच्या 69 व्या वर्धापन दिनी बोलतांना काढले. अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते.

रिपब्लिकन पक्षाचा 3 ऑक्टोबर रोजी होणारा वर्धापन दिन सतत पडणाऱ्या पावसामुळे एक महिना पुढे ढकलण्यात आला होता परंतु आज ही महाड येथे धो धो पाऊस पडला आणि या भर पावसात पक्षाचा वर्धापन दिन पार पडला. पावसामुळे मैदानात चिखल झाला होता. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून बसेस भर भरून आल्या होत्या परंतु या पावसात कार्यकर्त्यांनी बस मध्ये बसूनच कार्यक्रम पाहाणे पसंद केले. काही उत्साही कार्यकर्ते पावसात भिजत स्टेज समोर उभे होते यात महिलांचा सहभाग अधिक होता. चवदार तळे सत्याग्रहा प्रमाणे महाडला गर्दी झाली होती. पाऊस थांबल्या नंतर कार्यकर्त्यानी चवदार तळ्यावर थांबणेच पसंद केले.

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यानी प्रास्तविक केले. पावसामुळे कुणाचेही भाषणे न होताच केवळ ना. रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. रोजगार हमीमंत्री भरतशेठ गोगावले यांनी धावती भेट दिली. पावसामुळे कार्यक्रम लवकर आटोपता घ्यावा लागला.

वर्धापन दिन कार्यक्रमाला केंद्रीय सरचिटणीस, माजीमंत्री अविनाश महातेकर, राष्ट्रीय महिला आधाडी नेत्या सीमाताई आठवले, उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, चिटणीस दयाल बहादुरे, आठवले साहेबांचे पी ए प्रवीण मोरे, परिवर्तन कला मंचचे अध्यक्ष साहेबराव सुरवाडे, ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश बारसिंग, युवा अध्यक्ष पप्पू कागदे, मुस्लिम आघाडी अध्यक्ष मुस्ताक बाबा, रायगडचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, ठाणे प्रदेश अध्यक्ष आण्णासाहेब रोकडे, कर्जतचे माजी उप नगराध्यक्ष राहुल डाळिंबकर, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, राज्य सह सचिव राहुल हंडोरे, सचिव मामा गायकवाड, कोकण प्रदेश संघटक मारुती गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड, सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे, कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, पुणे जिल्हा महिला आधाडी अध्यक्षा चंद्रकांता गायकवाड आदि विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


COMMENTS