– शिवसेना नेते बबन उरकुडे यांचा आर्वी पाचगाव रामपूर क्षेत्रात झंजावात.
– कलमना गावातील व वरूर गावातील काँग्रेस, संघटना आणि भाजपतील शेकडो कात्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन.
राजुरा ७ नोव्हेंबर
गौतम नगरी चौफेर सौ. सुवर्णा बादल बेले –
समोर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाने राजुरा तालुक्यात आपली ताकद पणाला लावली आहे.
तालुक्यातील पाचगाव-आर्वी- रामपूर आणि सास्ती गोवरी क्षेत्रात जोरदार तयारी चालू केली असून अन्य राजकीय पक्ष मात्र मागे पडताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेस उमेदवारासाठी चाचपणी करत आहे तर संघटना मात्र मौन अवस्थेत कोणता झेंडा युतीत घायच्या या सभ्रमात आहे. भाजप सारखा बलाढ्य पक्ष संघटनात्मक बैठका घेण्यात व्यस्त असून महिला उमेदवाराची निवड करताना सभ्रमात आहे. मात्र एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार म्हणून विनंती निवेदन छापून गावागावात जाऊन प्रचार चालू केला आहे. पाचगाव रामपूर आर्वी क्षेत्रासाठी शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या पत्नी आणि गोवरी गावच्या विद्यमान सरपंच आशाताई उरकुडे यांनी उमेदवार म्हणून मोर्चे बांधणी चालू केली असून क्षेत्रातील भेदोळा, भुरकुंडा, चंदनवाही, हरदोना, कलमना गावामध्ये कॉर्नर सभा आणि बैठका संपन्न झाल्या.
तालुक्यातील पाचगाव आर्वी आणि सास्ती गोवरी जिल्हा परिषद क्षेत्रासाठी शिवसेना उबाठाने आग्रही भूमिका घेत युती आघाडीचा निर्णय झाला नसला तरी स्वातंत्र लढण्याची भूमिका घेतली असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराला देखील सुरवात केली आहे. या क्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये आमचा संपर्क आणि आमी ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या असून येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला आमचे संघटन अधिक मजमुत करायचे आहे असा विश्वास बबनभाऊ उरकुडे यांनी व्यक्त केला.

कलमना गावातील युवक युवती मयूर गौरकार, सचिन विरुटकर, प्रीतम वाढरे, प्रवीण भेंडारे, सुरज बोरडे, सुधीर गौरकार, अमित बल्की, शुभम वाढई, गोलू वाढई, सूर्यभान भेंडारे, मारोती भेंडारे, सुशांत वांढरे, आशिष कावळे अतुल अटकारे, वैभव अटकारे, नितेश विजय थिपे पिंगे, धीरज इडे, सुनील इडे, अजय थिपे अक्षय अटकारे, महेश दिवसें, अरुण वाढई, सुरेश कावळे, भाऊराव दिवसें आनंदराव वाढरे केशव गौरकार, गजानन गौरकार,मनीषा गौरकार, सुषमा वाढई,नंदा कौरासे प्रतीक्षा अटकारे प्रांजली पिंगे आणि असंख्य नागरिकांनी पक्षाचा झेंडा हाती घेत शिवसेना उबाठाला समर्थन दिले.


COMMENTS