महापुरुषांच्या चरणीपुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज परिवर्तनाचीहीच योग्य वेळ …मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा ..!!
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी गडचांदूर) – ना जातीचे ना पातीचे ना धर्माचे ना पंथाचे विश्वास व विकासाचे .. भुषण फुसे केवळ जनतेचे ! अशा विविध घोषणांनी आवाज कुणाचा संभाजी ब्रिगेडचा ..! अशा दणक्यात नामांकन अर्ज दाखल केला, राजुरा विधानसभा मतदार संघातून ..यांनी यावेळी अलोट जनसागरात लक्षणीय उपस्थिती होती ती लाडक्या माता भगिनींची .! राजुरा मतदार संघासाठी संभाजी ब्रिगेडचे उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते शिवश्नी भुषण मधुकराव फुसे यांनी भारतरत्न, परमपूज्य, बोधीसत्व, महामानव, मुक्याना बोलायला लावणारा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, शहीद बिरसा मुंडा आणि शहीद बाबुराव शेडमाके यांच्या चरणी पूष्पांजली अर्पण करून नामांकन अर्ज दिनांक २९ आँक्टोबरला सोमवार रोजला अलोट जनसमुदायांच्या अलोट गर्दीत नामांकन अर्ज दाखल करून प्रचाराचे जोरदार रणशिंग फुंकले ! त्यांच्या नामांकन अर्ज दाखला करण्यासाठी चंद्रपूर जिल्हांचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्यकर्ते यावेळी उपस्थितीत विविध कार्यकर्ते भाषणाच्या अनुशंगाने तुम्ही या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात निवडून या अन् विकास काय -! असतो तिथे दाखवून द्या असे गौरवोदगार संभाजी ब्रिगेडचे नेते.
शिवश्नी राजु बोढे, प्रेमानंद डाहुले, संतोष निखाडे, अविनाश काळे, सुधाकर तिरानकर, गिरीधर बोढे, नामदेवराव ठेंगणे, संजय बांधुरकर, शंकर बोढे,आशिष आगरकर, शिवश्नी काकडे आदीनी या दरम्यान यांनी काढून राजुरा मतदार संघात सर्वधर्म समभाव आणणार आमदार म्हणजे भुषण फुसे असल्याचे सांगून त्यांना पुढच्या मंत्रीमंडळात मी आम्ही शिफारशी करेल :- ही ग्वाही यावेळी दिली. या संभाजी ब्रिगेडच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज दाखल केल्याचे भुषण फुसे यांनी या दरम्यान सांगितले.
यावेळी मंचावर संभाजी ब्रिगेडचे तसेच विविध समाज बांधव. अन् माता..भगिनींनी लक्षणीय उपस्थिती दाखवून मला आशिर्वाद देण्यासाठी गाव खेड्यातून आल्याने मला आनंद गगनात मावेनासा झाला आहे! या माझ्या रैलीत उपस्थित लोकांचे आभार मानले, यावेळी विजयी संकल्प सभापार पडली यावेळी सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शिवश्नी रामदासजी चौधरी यांनी केले हे विशेष …
COMMENTS