पर्यावरणप्रेमी मिलिंद पगारे यांची सास्ती शाळेत कौशल्यविकसन कार्यशाळा.

HomeNewsनागपुर डिवीजन

पर्यावरणप्रेमी मिलिंद पगारे यांची सास्ती शाळेत कौशल्यविकसन कार्यशाळा.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – दि.२० ऑगस्ट पर्यावरणप्रेमी, शिक्षणप्रेमी व समाजसेवक मिलिंद पगारे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सास्ती (मराठी) येथे सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकसन व मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतली. यावेळी पगारे यांनी विद्यार्थ्यांना ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ या विषयाचे महत्त्व समजावून सांगत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व उपयुक्त वस्तू कशा तयार करता येतात, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. विविध टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करून आकर्षक व नाविन्यपूर्ण वस्तू तयार करण्याच्या पद्धती त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. विशेष म्हणजे, विविध शैक्षणिक विषयांतील संकल्पना खेळ, कृती व मनोरंजक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंदाने विविध संकल्पना आत्मसात केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पकता आणि कौशल्य विकासाला चालना मिळाली.

या प्रेरणादायी भेटीबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने मिलिंद पगारे यांचा भारतीय संविधानाची प्रत व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल शिक्षकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक हंसराज शेंडे, केंद्रप्रमुख श्वेता आगलावे, विषय शिक्षिका करुणा गावंडे, अर्चना डांगरे, महेश नांदे व अश्विनी पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत विविध उपक्रमांचा लाभ घेतला.
मिलिंद पगारे यांच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर, सर्जनशीलता, कौशल्य विकास आणि कृतीतून शिक्षण यांची प्रभावी सांगड घालण्याची प्रेरणा मिळाली.

You cannot copy content of this page