सुुमठाना ग्रामस्थांचा जन्म-मृत्यू नोंदीसाठी आंदोलनाचा इशारा२०११ पूर्वीच्या नोंदीच नसल्याने नागरिकांना आर्थीक भुर्दंड

HomeNewsनागपुर डिवीजन

सुुमठाना ग्रामस्थांचा जन्म-मृत्यू नोंदीसाठी आंदोलनाचा इशारा२०११ पूर्वीच्या नोंदीच नसल्याने नागरिकांना आर्थीक भुर्दंड

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – राजुरा तालुक्यातील सुमठाना ग्रामपंचायतीतील जन्म व मृत्यूच्या नोंदी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. संबंधित नोंदी तातडीने उपलब्ध करून न दिल्यास १ सप्टेंबर २०२६ पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, समठाना ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या जन्म – मृत्यू नोंदींपैकी जुन्या नोंदी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांनी जन्म व मृत्यू प्रमाणपत्रासाठी मागणी केल्यानंतरही संबंधित नोंदी उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याने नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जन्म-मृत्यूच्या नोंदी या अत्यावश्यक शासकीय नोंदी असून त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जतन करणे आवश्यक आहे. नोंदी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना अनावश्यक खर्च, वेळ आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे सुमठाना ग्रामपंचायतीतील संपूर्ण जन्म – मृत्यू नोंदवही व संबंधित रेकॉर्ड तातडीने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याविषयी ग्रामसेवक विठोबा धुर्वे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी २०११ पूर्वीच्या जन्म- मृत्यूच्या नोंदी कार्यालयात उपलब्ध नसल्याने तशा आशयाचे प्रमाणपत्र देत आसल्याचे सांगितले. मात्र २०११ पासूनच्या नोंदी असून त्या उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
रेकॉर्ड उपलब्ध करून न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी गावक-यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती आमदार देवराव भोंगळे, राजुरा उपविभागीय अधिकारी, तसेच तहसीलदार, राजुरा यांना देण्यात आल्या आहेत. मागणीची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा निर्धार सुलताना येथील नंदकिशोर कुबडे, मंथन वाघाडे, ज्ञानेश साठोणे, साहिल येरणे, पियुष देवाळकर, सदाशिव डंबारे, कुंदन सातघरे, यश मानुसमारे, करण वाघाडे, आर्यन सातघरे, आसमान शेंडे व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page