गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) – औद्योगिक नगरी गडचांदूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे तारीख १८ ऑगस्ट २०२६ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर या पक्षाची तालुका स्तरीय बैठक निळाई, सिद्धार्थ विहार, गडचांदूर येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक सेवानिवृत्त प्राचार्य रमेश पाटील सर होते.
बैठकीत १) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा स्थापना दिवस ३० सप्टेंबर व्यापक प्रमाणात साजरा करण्याचे ठरविण्यात आले. २) रिपब्लिकन जनसंपर्क अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले असून गाव तिथे रिपब्लिकन पक्षाची शाखा आणि प्रत्येक गावाच्या दर्शनी भागात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि समता सैनिक दल या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या तिन्ही पक्ष आणि संघटनेचे स्वागत फलक लावण्यात येणार आहे. ३) येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपब्लिकन पार्टीच्या वतीने स्वबळावर तसेच युती, आघाडी करून लढण्याची तयारीला लागण्याचे ठरविण्यात आले. ४) तारीख २१ ऑगस्ट २०२६ ला गडचिरोली येथे रिपब्लिकन कार्यकर्ता मेळाव्यात जायचे ठरविण्यात आले.

बैठकीला रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे यांनी रिपब्लिकन पार्टी सोबतच समता सैनिक दलाची प्रत्येक गावात उभारणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. यावर विशेष भर देण्यात आला. कोरपना तालुका अध्यक्ष दिनेश झाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले आणि तालुका महासचिव मुनेश्वर मेश्राम यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, जिल्हा संघटक प्रा. रमेश पाटील सर, कोरपना तालुका अध्यक्ष दिनेश झाडे, तालुका महासचिव मुनेश्वर मेश्राम, जिवती तालुका अध्यक्ष शाहिर तुकाराम जाधव, गडचांदूर शहर उपाध्यक्ष राजू कांबळे, पी. एम. खाडे, जेष्ठ कार्यकर्ते ईश्वर आत्राम, तालुका युवाध्यक्ष रवि पेगडपल्लीवार, शिवाजी धुपे, चिंतामणी घुले, किशोर डोंगरे, विठ्ठलराव क्षिरसागर, नामदेव ताकसांडे इत्यादींची उपस्थिती होती.
