अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न

गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे): अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या नौकारी चुनखडी खदान, आवारपूर सिमेंट वर्क्स यांनी ६ नोव्हेंबरला नागपूर येथे खाण सुरक्षा महासंचालनालय (डीजीएमएस) पश्चिम विभाग, नागपूर प्रदेश १ आणि २ यांच्या नेतृत्वाखाली ४३ व्या धात्विक खाण सुरक्षा सप्ताह – २०२५ साठी कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित केली. या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत नागपूर प्रदेश क चे खान सुरक्षाचे संचालक प्रफुल्ल रंजन ठाकूर, दुर्गा शंकर सालवी आवारपूर उपाध्यक्ष आणि खाण एजंट सौदीप घोष, उपसंचालक एस. आर. महतो, प्रकाश बी, के श्रीनिवास, नागपूर प्रदेशातील खाण क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावर्षी खाण सुरक्षा आठवड्यात एकूण ४१ खाणी सहभागी होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ०८ खाणींची वाढ झाली आहे. या बैठकीत या वर्षीची थीम सुरक्षित सोच ही, हमारा सुरक्षा कवच अशी निश्चित करण्यात आली आहे. व्यापार चाचणी, प्रथमोपचार चाचणी आणि खाणी तपासणीच्या नियोजित तारखांसोबतच यावरही चर्चा झाली. इतर खाणींच्या सर्वोत्तम सुरक्षा पद्धतींचा अवलंब, प्रचार आणि खाणकामात संबंधित लोकांचा सहभाग वाढवण्यावर चर्चा झाली.

COMMENTS

You cannot copy content of this page