गडचांदूरात सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदूरात सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी

नगर परिषद निवडणूक; आजी, माजी पदाधिकारी तयारीत

गौतम नगरी चौफेर  : शिला धोटे गडचांदूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, येथे अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. सध्यातरी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत असून, आजी, माजी पदाधिकारी अॅक्टीव्ह झाले आहेत.

नगर परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचा प्रयत्न जरी झाला तरी लहान घटक पक्षांचा पाहिजे तेवढा जनाधार नसल्याने जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच स्वतंत्रपणे लढले तरच बरे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

गडचादूर  नगर परिषदेची  सार्वत्रिक निवडणूक दरम्यान  मागिल हेवेदावे पाहिले तर मग तेव्हापासून आता अर्थात २ डिसेंबरला निवडणूक होणार असल्याने मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
आगामी (नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. या निवडणुकीत भाजप व काँग्रेस हे मोठे पक्ष असून, त्यांची नजर मात्र छोट्या प्रमुख पक्षांवर राहणार आहे. छोटे पक्षही आपला प्रभाव टाकू शकतील, याचा त्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

💙अध्यक्षपदासाठी निवडणुकीत
24457 मतदारांना मतदानाचा हक्क बजावणार आहेत
# या गडचांदूर नगररिषद  निवडणुकीत एकूण   24457 एवढ्या मतदारांना मतदानाचा हक्क
आहे ,

मागील २०१९ च्या गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपद अनुसूचित – जमातीसाठी राखीव होते. त्यात काँग्रेसच्या सविता टेकाम विजयी झाल्या. त्यावेळी न काँग्रेस ५, शिवसेना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ४, भाजपा २ व शेतकरी संघटना एक – असे पक्षीय बलाबल होते. त्यावेळी १७- नगरसेवकांसाठी निवडणूक झाली होती. मात्र, यावेळी २० नगरसेवकांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. शहरात एकूण दहा प्रभाग असून, एकूण मतदार संख्या २४४५७ एवढी आहे. सर्वाधिक ३००५ मतदार प्रभाग एकमध्ये आहे.

तर सर्वात कमी १८६८ मतदार प्रभाग दोनमध्ये आहे. सर्वसाधारणसाठी दहा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पाच, अनुसूचित जाती तीन, अनुसूचित जमाती दोन, असे एकूण २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. गडचांदूर क्षेत्र काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या शहरातून आघाडी घेतली होती. मात्र विधानसभेत भाजपाने आघाडी घेतली. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहे. गडचांदुरातील नगराध्यक्षपद सर्वसाधारण

असल्यामुळे अनेक पुढारी या पदासाठी इच्छुक आहेत. औद्योगिक नगरी असल्यामुळे नगरपरिषदेला मिळणारा कर कोट्यवधीच्या घरात असून, राजकीय पक्षांनी अध्यक्षपदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय व सामाजिक समीकरणे जुळविण्यास सुरुवात केली आहे. ही समिकरणे जुळविण्यासाठी उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे.  नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उमेदवारांना संबंधित पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.


या निवडणुकी दरम्यान सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार

पल्लवी आखरे यांनी आयोजित (गडचांदूर)पत्रकार परिषदेत केले. यावेळी मुख्याधिकारी विविध नेते आणी पञकार उपस्थित होते. या निवडणुकीत जवळपास (8०)कर्मचारी सहभागी होऊन निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यास सहकार्य करतील. (उमेदवारांची घोषणा अजून बाकी असली तरी भाजप व काँग्रेस मध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचीही अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी परिपूर्ण तयारी सुरू आहे. एकंदरीत स्थिती  पाहता  निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाची बाजू मजबूत राहील, हे आताच बोलले जाऊ शकत नाही. राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अनेक माजी पदाधिकारी व नवीन चेहरे अॅक्टीव्ह मोडवर आले आहेत. नागरिकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांच्या अडचणींना धावून जाणे, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणे आदी कामे जोमाने सुरू केले

COMMENTS

You cannot copy content of this page