गौतम नगरी चौफेर (राहुल हंडोरे उल्हासनगर) – दि. 15 नोव्हेंबर
अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण कुणी बदलू शकत नाही असे उदगार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांनी उल्हासनगर. 4 येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित डॉ बालाजी किणीकर यांच्या प्रचार सभेत काढले.
भारत देश संविधानावर चालतो, ज्यांना संविधान मान्य आहे त्यांनच भारतात राहण्याचा हक्क आहे. देशाच्या 80% लोकांना माझ्या सामाजिक न्याय खात्यामार्फत फायदा मिळतो आहे. पूर्वी दलित पँथर आमची प्रभावी संघटना होती. अन्याय अत्याचाराच्या विरोधात घाव घालायचा तर घालायचा आमची पद्धत होती. आता रिपब्लिकन पक्ष माझा गट हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. आमची स्वतंत्र ओळख आहे.
महायुतीची सत्ता आल्यास डॉ बालाजी किणीकर याना मंत्रिपद मिळायला हवय अशी भावनाही आठवले यांनी व्यक्त केली. मी जांच्या बरोबर राहतो त्याना सत्ता मिळते. मला हवेचा रोख चांगला समजतो असे ही आठवले म्हणाले.
अंबरनाथ मतदार संघांचे उमेदवार डॉ बालाजी किणीकर म्हणाले की, उल्हासनगर मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, अंबरनाथ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्क्रतिक भवन, डॉ आंबेडकर कॅनवेसिंग सेंटर, अनु. जाती जमाती विद्यार्थ्यांना निवासी शाळा, अंबरनाथ मध्ये होऊ घातलेलं मेडिकल कॉलेज आदी उपक्रम मी सुरु केले आहेत असेही डॉ किणीकर म्हणाले.
प्रारंभी रिपब्लिकन पक्षाचे उल्हासनगरचे कार्याध्यक्ष शांताराम निकम यांनी प्रास्तविक केले. शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी भारतीय संविधानवर प्रकाशझोत टाकला. रिपब्लिकन पक्षांचे प्रसिद्धी विभाग प्रतिनिधी राहुल हंडोरे यांनी रामदास आठवले यांच्यावर आगळी वेगळी कविता सादर केली.
सभेला रिपब्लिकन पक्षांचे केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत, रिपाई ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश बारसिंग, माजी मंत्री जग्गनाथ पाटील, रिपाई उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष नाना बागुल, शिवसेना कल्याण जिल्हा अध्यक्ष गोपाळ लांडगे, जेष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष संजय गायकवाड, उल्हासनगर सरचिटणीस पॅन्थर अरुण कांबळे, शिवसेनेचे उल्हासनगर अध्यक्ष राजेंद्र चौधरी, रिपब्लिकन जेष्ठ नेते नाना पवार, कमलाकर सूर्यवंशी आदी. हजर होते. सभेला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हासनगरचे सचिव मोहोड यांनी केले.
COMMENTS