संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात खाऊ वाटप

HomeNewsचंद्रपूर

संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात खाऊ वाटप

गौतम नगरी चौफेर (सोलापूर (संजीव भांबोरे) – सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे गोविंद वृद्धाश्रमामध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी .टी .आंबेगावे यांचा वाढदिवस वृद्ध आजी आजोबांच्या हस्ते केक कापण्यात आला व  खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, जिल्हा सचिव प्रमोद राऊत, वृद्धाश्रमातील आजी आजोबा, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी नेहमी सहकार्य करणे, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुरांना मदत करणे, महिलांचा सन्मान करणे, महिलांचे प्रश्न सोडविणे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, पत्रकार व त्यांच्या कुटुंबाना आरोग्यविषयक सुविधा पुरविणे यासह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी डी टी आंबेगावे नेहमी प्रयत्नशील असतात.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पी जी कोटूरवार, पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, सचिन जाधव, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका कार्यकारिणी, सर्व पदाधिकारी व पत्रकार, उद्योग, व्यापार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, कायदा आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS