सेवानिवृत्ती शिक्षकांनी समाजातील गुणवंत विद्यार्थी घडविण्याकरिता सहकार्य करावे –राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे

HomeNewsनागपुर डिवीजन

सेवानिवृत्ती शिक्षकांनी समाजातील गुणवंत विद्यार्थी घडविण्याकरिता सहकार्य करावे –राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे

प्रमोद बोरकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ  व पुष्पगुच्छ देऊन सत्कार


गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज दिनांक 30 नोव्हेंबर 2024 ला सायंकाळी 7 वाजता खाजगी शिक्षण संस्थेत मागील 30 वर्षापासून कार्यरत असलेले प्रमोद वनवास वासनिक यांचा सेवानिवृत्ती सत्कार  भंडारा तालुक्यातील अंबाडी येथील निवासस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .यावेळी मार्गदर्शन करताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे म्हणाले की, प्रमोद वनवास बोरकर शांत, मनमिळावू व चेहऱ्यावर सतत हास्य  असणारे व्यक्तिमत्व असून अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी सहाय्यक शिक्षक पदापासून तर मुख्याध्यापक पदापर्यंत 30 वर्षे शिक्षकी पेशाची जबाबदारी पार पाडली. परंतु शिक्षक सेवेत असताना त्यांना त्यांच्या  कामाच्या मोबदला मिळत असतो. परंतु सेवानिवृत्ती झाल्यानंतर शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत आपले कार्य सुरळीत सुरू ठेवावे व जे समाजातील होतकरू गरीब, गुणवंत, हुशार विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना करता स्पर्धा परीक्षांकरिता  सहकार्य करावे. जेणेकरून हे विद्यार्थी आपले भविष्य घडवू शकतील अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे विदर्भ महासचिव शेखर बोरकर, नागपूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपशिक्षणणाधिकारी मदन बोरकर, महिलाराज सत्ता आंदोलनाच्या प्रमुख रत्नमाला वैद्य, प्राचार्य राजन बोरकर, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे विजय बोरकर, कुंदन तागडे, पिंटू बोरकर, नितीन बागडे, विवेक चव्हाण, शैलेश बोरकर, सुहास गजभिये, कृष्णाजी शेंडे, प्रज्वल बोरकर, राजेश सुखदेवे, राजेश बोरकर, रोशन मेश्राम पंजाब भोंदे सुरेखा उके, राहुल चव्हाण, अमीर बोरकर, भजन भोंदे, रणजीत भोंगाडे, महमूद बोरकर, राहुल बोरकर व मोठ्या संख्येने मित्रपरिवार व परिवारातील लोक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी सर्वांनी सहभोजनाच्या आस्वाद घेतला.

COMMENTS